‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीमध्येही अव्वल स्थानावर आहे. नवनवीन ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवण्यात मालिकेला यश आलं आहे. अशातच अर्जुनची एक भुवई वर असण्यामागच्या कारणाचा खुलासा झाला आहे. हा खुलासा अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: राहुल वैद्यच्या मुलीची पहिली झलक समोर; बहिणीने केला फोटो शेअर

अलीकडेच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळत आहेत. यावेळी निर्मिती सावंत अर्जुनची एक भुवई वर असण्यामागचं रहस्य सांगताना दिसत आहेत. निर्मिती सावंत म्हणतात की, “अर्जुन एकदा नदीत पोहायला गेला होता. तिथे एक माणूस मासे पकडायला गळ टाकून बसला होता. अर्जुन पोहत पोहत त्या माणसाच्या जवळ गेला आणि तो गळ त्याच्या भुवईत अडकला. तेव्हापासून त्याची एक भुवई वर आहे.” निर्मिती सावंत यांच्या या मजेशीर रहस्यानंतर सर्व कलाकार मंडळी हसताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स

हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीची जवळीक वाढताना दिसत आहे. अर्जुनला सायली आवडू लागली आहे. पण दुसऱ्याबाजूला टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर असलेली या मालिकेची जागा तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेनं घेतली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे, तर ‘ठरलं तर मग’ दुसऱ्या स्थानावर आली आहे.