अनेक कलाकार त्यांच्या रिलेशनशिपबद्दल, एक्स गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडबद्दल मोकळेपणाने बोलत असतात. त्यांचा चांगला, वाईट अनुभव शेअर करत असतात. अशातच आता ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री निती टेलरनेही या कार्यक्रमात तिच्या एक्स बॉयफ्रेंडबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलेलं. ज्यामुळे ती चर्चेत आलेली. अशातच आता तिने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

निती टेलरने ती रिलेशनशिपमध्ये असताना तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिला सिगारेटने चटके दिल्याचं सांगितलं होतं. ‘अलायन्स’मध्येही अभिनेत्रीने याबद्दल शोमधील एका स्पर्धकाशी संवाद साधताना सांगितलं होतं. अशातच आता तिने ती सहज हे बोलून गेली तिला माहीत नव्हतं की बाहेर त्याबद्दल इतकी चर्चा होईल. या शोमध्ये निती तिच्या स्पर्धकाला तिच्या पायावरील तिच्या एक्स बॉयफ्रेंडने दिलेल्या सिगारेटच्यास चटक्यांचे दाग दाखवत होती. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला.

अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण

अशातच आता फिल्मी ग्यानला दिलेल्या मुलाखतीत तिला निती तू मध्यंतरी तुझ्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं होतं, सिगारेटच्या चटक्यांबद्दल सांगितलं होतं. तेव्हा तुझ्या स्वभावामध्ये आणि आताच्या तुझ्या स्वभावात खूप फरक आहे का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो आता त्या गोष्टीला खूप वर्षे झाली आहेत. मी भूतकाळातील गोष्टींची पुनरावृत्ती करत नाही. ते जे दाग आहेत त्याबद्दल सहज कोणीतरी विचारलं आणि मीसुद्धा सांगितलं पण मला माहीत नव्हतं की बाहेर त्याचं इतकं काही होईल. पण मला असं वाटतं की वाईट गोष्टी घडत असतात पण तुम्हाला वाईट अनुभवांतून बाहेर पडावं लागतं, नवीन सुरुवात करण्यासाठी. ते घडलं नसतं तर कदाचित आज मी इथे असले नसते. प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं.”

निती टेलरला पुढे इतक्या वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेस, आता तुला काय बदल जाणवतो असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी खूप शिकले आहे, माणूस म्हणूनही खूप काही शिकायला मिळालं पण आजही मी तितकीच चांगली आहे, जमिनीवर राहणारी व्यक्ती आहे”.

दरम्यान, निती टेलरच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या आयुष्यात अभिनेत्री विवाहित असून पती परीक्षित बावा हे भारतीय लष्करातील अधिकारी आहेत. निती आणि परीक्षित यांनी १३ ऑगस्ट २०२० रोजी लग्न केलं.