scorecardresearch

प्रेमभंग झाल्यानंतरचा अनुभव शेअर करताना नोरा फतेहीला अश्रू अनावर; म्हणाली, “त्यावेळी मी…”

नोरा सहसा तिच्या आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही. पण यावेळी ती स्वतःला रोखू शकली नाही.

प्रेमभंग झाल्यानंतरचा अनुभव शेअर करताना नोरा फतेहीला अश्रू अनावर; म्हणाली, “त्यावेळी मी…”

बॉलिवुडमधील आघाडीची नृत्यांगना म्हणून नोरा फतेहीचे नाव घेतले जाते. सध्या ती ‘झलक दिखला जा १०’ या डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षकाची भूमिका निभावतेय. या शोच्या माध्यमातून नोराबद्दल अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर आल्या. तर आता नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये तिने तिच्या प्रेमभंगाच्या अनुभवावर भाष्य केलं आहे.

‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनालेचे टॉप ६ स्पर्धक रुबिना दिलीक, गश्मीर महाजनी, निशांत भट, गुंजन सिन्हा, फैसल शेख आणि श्रिती झा यांनी शोमध्ये त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स दिला. यावेळी श्रितीने ‘बडा पछताओगे’ या गाण्यावर नृत्य सादरीकरण केलं. तिचा डान्स पाहून नोरा भारावून गेली आणि तिला अश्रूही अनावर झाले. नोराने या गाण्याच्या तिच्या आठवणी सांगितल्या.

आणखी वाचा : “दिग्दर्शकाने माझ्याशी शारीरिक संबंध…”; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

श्रिती झा आणि तिचा कोरिओग्राफर विवेक चचेरे यांना या डान्ससाठी पैकीच्या पैकी गुण मिळाले नसले तरी त्यांचे सादरीकारण नोरा फतेहीच्या हृदयाला स्पर्श करून गेलं. हे गाणं नोरावर चित्रित झालं आहे. या शोमधील या गाण्यावर केलेलं सादरीकरण पाहून नोराला अश्रू अनावर झाले. याचं मुख्य कारण म्हणजे या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान ती या गाण्याच्या भावनांना खूप रिलेट करत होती.

नोरा सहसा तिच्या आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही. पण हे सादरीकरण पाहून ती व्यक्त झाली. नोराने सांगितलं की हे तिचं गाणं आहे आणि तिच्या भावना पूर्णपणे त्या गाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यावेळेस ती तशाच परिस्थितीतून जात होती. ती म्हणाली, “त्यावेळी माझे वैयक्तिक नुकसान होत होते आणि शूटिंगदरम्यान या गाण्याशी भावनिकरित्या बांधले गेले होते. माझ्या सगळ्या भावना मी सेटवर माझ्याबरोबर आणायचे.”

हेही वाचा : “आज मी तुमच्यामुळे…”, रश्मिका मंदानाने माधुरी दीक्षितबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

‘बडा पछताओगे’ हे गाणे प्रेमाभंगावर आधारित आहे आणि नोरा फतेही त्यावेळी अंगद बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. नोराचे नाव तिच्या सहकलाकारांसोबत जोडले जात होते परंतु तिने तिचे वैयक्तिक आयुष्याबाबत गुप्तता पाळण्यास प्राधान्य दिले. आता अंगदने नेहा धुपियाशी लग्न केले असून त्याला दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 13:43 IST

संबंधित बातम्या