गणेशोत्सव म्हणजे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. मोठ्या धुमधडाक्यात गणपतीचे आगमन होते. यावेळी अनेक जण श्रीगणेशाकडे आपल्या इच्छा सांगत असतात, काही मागणे मागत असतात. काही जण आपल्या मनातील गोष्टी गणपतीला सांगून मन मोकळे करतात. आता ‘झी मराठी’ या वाहिनीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेतील मास्तरीणबाईंनी म्हणजेच अक्षराने गणपतीकडे एक गोष्ट मागितली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अक्षराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी पुस्तक वाचत बसली असून, तिला फोन येतो. हा फोन गणपती बाप्पाचा असल्याचे दिसते. ती फोन उचलते आणि म्हणते, “हॅलो बाप्पा, कसा आहेस तू? एरवी तू आम्हाला विचारतोस, कशी आहेस, कसा आहेस; पण आज मी तुला विचारते, तू कसा आहेस? तुझ्या उत्सवाची आम्ही जोरदार तयारी करतोय आणि तुझ्या आगमनाची आतुरतेनं वाट बघतोय. यावेळी खूप लोक खूप काही तुझ्याकडे मागत असतील. मलाही तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे; पण मी माझ्यासाठी काही मागणार नाही. मला तुझ्याबरोबर काहीतरी शेअर करायचं आहे. गेले काही दिवस वर्तमानपत्र उघडलं, सोशल मीडिया उघडलं की, खूप बातम्या दिसतात; ज्यामध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कळतं. मुली म्हणजे अगदी चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल, शाळेत घडणाऱ्या अत्यंत वाईट घटनांबद्दल कळतंय.

gharoghari matichya chuli serial janaki stand for ovi against aishwarya new promo out
लेकीसाठी जानकी धारण करणार रौद्र रूप, ऐश्वर्याला दिली सक्त ताकीद; जाणून घ्या ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये नेमकं काय घडणार….
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
tharala tar mag sayali pratima and raviraj killedar perform Ganpati pooja
ठरलं तर मग : प्रियाचा डाव फसला! पूर्णा आजीचा ‘तो’ निर्णय अन् प्रतिमा-रविराजसह सायलीने केली बाप्पाची पूजा, पाहा प्रोमो
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Tula Shikvin Changlach Dhada
Video : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत घटस्थापनेच्या दिवशी दुर्गेश्वरीनं रचलं कारस्थान; प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “हाकलून द्या…”
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
झी मराठी इन्स्टाग्राम

“मुलींना सुरक्षित वाटेल अशा वातावरणाची निर्मिती होऊ दे”

“वर्तमानपत्र अगदी अशा बातम्यांनी भरून गेलेलं असतं की, ते बघून प्रचंड त्रास होतो. असं वाटतं की, शाळेसारखी जागा सुरक्षित नसेल, तर मुलींना कुठे सुरक्षित वाटणार? आणि म्हणून मला तुझ्याकडे असं मागायचं आहे की, मुलांआधी पालकांना आपल्या मुलांना कसं वाढवायचं याचं शिक्षण दे, बुद्धी दे. मुलींनी कसं वागावं, कसं बोलावं, कसे कपडे घालावेत यापेक्षा मुलांची नजर कशी असावी, आपण आपल्या मुलाला कसे वाढवत आहोत. मुलींनी घरात ७ च्या आत यायला पाहिजे यापेक्षा ७ नंतर आपला मुलगा काय करतो, तो कुठे असतो, त्याची संगत काय आहे, या गोष्टींचा पालकांनी विचार करावा, अशी बुद्धी त्यांना दे. मुलींना, बहिणींना, आत्यांना, मामींना, आजीला, आईला सुरक्षित वाटेल अशा वातावरणाची निर्मिती होऊ दे. मला खात्री आहे की, तुझ्या येण्यानं हे जे मळभ आलेलं आहे ते सगळं दूर होईल आणि प्रकाशच प्रकाश पसरेल सगळीकडे. माझी ही मागणी तेवढी पूर्ण कर.”

हेही वाचा: आधी तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग, आता हिना खानला ‘या’ गंभीर आजाराचं निदान; जेवताही येईना, म्हणाली, “वेदना…”

काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर शाळेत अत्याचार झाला होता. त्याआधी कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनानांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच आता मास्तरीणबाईंनी गणपती बाप्पाकडे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात साकडे घातल्याचे झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करीत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.