Mrunmayee Gondhalekar Dance On occasion of Ashadhi Ekadashi: आषाढ महिन्यात कित्येक वारकरी पंढरीची वारी करतात. वारी ही खूप जुनी परंपरा आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या, पालख्या येतात. वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यामुळे आषाढी एकादशीचे मोठे महत्त्व आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करीत आहेत. अनेक कलाकार या वारीमध्ये सहभागी झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अनेक कलाकारांनी त्यांचा अनुभवदेखील सांगितला. आता अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने आषाढी एकादशीनिमित्ताने खास नृत्य सादर केले आहे.
“हे पंढरीची माऊली विठोबा-रखुमाई…”
मृ्ण्मयीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नृत्य सादर केल्याचे पाहायला मिळत आहे. सारंग कुलकर्णी व राहुल देशपांडे यांच्या लोकप्रिय श्रीरंग विठ्ठला गाण्यावर तिने नृत्य केले आहे. साडी, गळ्यात मोत्याच्या माळा, केसात गजरा, हातात बांगड्या, असा शृंगार तिने केल्याचे दिसत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि तिचे हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने खास कॅप्शन लिहिली आहे.
मृण्मयीने लिहिले, “वारकऱ्यांची पाऊले निघाले पंढरपुरी, नृत्यामधुनी मी ही केली आषाढीची वारी, नृत्य पदंन्यासातून, आळविले माऊलीला, पाठीशी उभा रहा सांगते, त्या सावळ्याला. हे पंढरीची माऊली विठोबा-रखुमाई, कृपा असू दे, हेच मागते तुमची मृण्मयी”, असे म्हणत अभिनेत्रीने विठ्ठलाकडे प्रार्थना केली आहे.
अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर विविध गाण्यांवर नृत्य करताना दिसते. तिच्या डान्सच्या व्हिडीओंवर सोशल मीडियावर चाहते पसंती दर्शविताना दिसतात. सध्या मृण्मयी ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने तुळजा ही भूमिका साकारली आहे. सूर्या व तुळजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते.
सूर्या व त्याच्या कुटुंबासाठी तुळजा अनेक गोष्टी नि:स्वार्थीपणे करताना दिसते. ती सूर्यावर जितके प्रेम करते. तितकीत त्याच्या घरातील इतरांचीदेखील ती काळजी घेते. त्याच्या बहिणींची आईच्या मायेने काळजी घेते. तात्यांना वडिलांप्रमाणे जपते. तिचे वडील म्हणजेच डॅडी सूर्याला फसवत असल्याचे समजल्यानंतर ती त्यांच्याविरोधात जाते. त्यामुळे तुळजाचे प्रेक्षकांचे मनात एक वेगळे स्थान आहे. काही दिवसांपूर्वीच तुळजाच्या आईचे निधन झाले. मात्र, हे सर्व डॅडींनी घडवून आणले आहे, हे सूर्या व तुळजाला कधी कळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.