Bigg Boss Marathi Online TRP : छोट्या पडद्यावरील प्रत्येक कार्यक्रमाची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरत असते. त्यामुळे टीआरपीत सातत्य राखण्यासाठी वाहिन्यांमध्ये नेहमीच चढाओढ सुरू असते. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचं ऑनलाइन प्रसारण जिओ सिनेमावर करण्यात येतं. त्यामुळे ‘बिग बॉस’ ऑन एअर झाल्यावर जिओ सिनेमाचा टीआरपी वाढेल अशी सर्वत्र चर्चा चालू होती. अखेर हा अंदाज आता खरा ठरला आहे.

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्याचा Online TRP आता प्रेक्षकांसमोर आला आहे. या आठवड्यात ऑनलाइन TRP च्या यादीत मोठा उलटफेर झाला असून, जिओ सिनेमाने ‘बिग बॉस मराठी’ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे या यादीत थेट सहावं स्थान मिळवलं आहे. याचा अर्थ रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या या नव्या सीझनला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. हा ऑनलाइन टीआरपी ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आहे. २७ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यानचा हा ऑनलाइन टीआरपी आहे.

online trp list bigg boss marathi at fourth place
‘बिग बॉस मराठी’ने लोकप्रिय मालिकांना काढलं मागे! ऑनलाइन TRP मध्ये मिळवलं ‘हे’ स्थान, पाहा संपूर्ण यादी…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
trp list of top 15 serial
TRP च्या शर्यतीत कोणी मारली बाजी? टॉप ५ ठरल्या स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिका, तर ‘झी मराठी’…; पाहा संपूर्ण यादी
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
trp marathi serial shivani surve serial grabs second place
TRPच्या शर्यतीत शिवानी सुर्वेच्या मालिकेची मोठी झेप! ‘बिग बॉस मराठी’ कितव्या स्थानावर? पाहा टॉप-१० कार्यक्रमांची यादी…
bigg boss marathi nikki emotional cried in front abhijeet
Bigg Boss Marathi…अन् सगळ्यांशी भांडणारी निक्की ढसाढसा रडली! अरबाजबद्दल म्हणाली, “मी या मुलासाठी…”
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा

हेही वाचा : Bigg Boss Marathi : आर्याचं एकतर्फी प्रेम; वैभव-इरिनाला एकत्र पाहून ढसाढसा रडली! नेटकरी म्हणाले, “अगदी बालिशबुद्धी…”

ऑनलाइन टीआरपीच्या यादीत टॉप – १० मध्ये कोणत्या मालिका आणि कार्यक्रम आहेत जाणून घेऊयात…

Online TRP : टॉप १० कार्यक्रम व मालिका

१. ठरलं तर मग – हॉटस्टार
२. लक्ष्मीच्या पाऊलांनी – हॉटस्टार
३. प्रेमाची गोष्ट – हॉटस्टार
४. थोडं तुझं आणि थोडं माझं – हॉटस्टार
५. घरोघरी मातीच्या चुली – हॉटस्टार
६. बिग बॉस मराठी – जिओ सिनेमा
७. नवरी मिळे हिटलरला – झी ५
८. येड लागलं प्रेमाचं – हॉटस्टार
९. मुरांबा – हॉटस्टार
१०. पारू – झी ५

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “वर्षाताई एक नंबर…”, वर्षा उसगांवकरांच्या ‘या’ निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, नेमकं काय घडलंय? वाचा

trp
Online TRP पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, टेलिव्हिजनप्रमाणे, ऑनलाइन टीआरपीच्या ( Online TRP ) यादीत सुद्धा ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. प्रतिमाची एन्ट्री झाल्यापासून या कार्यक्रमाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. आता येत्या काळात ‘बिग बॉस मराठी’ टॉप ५ मध्ये एन्ट्री घेणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.