‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत शरयूने मध्यवर्ती ‘पारू’ची भूमिका साकारली आहे. अल्पावधीत शरयूची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

अभिनेत्री शरयू सोनावणेची ‘पारू’ मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. काही काळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. तसंच साध्या भोळ्या ‘पारू’ची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच ‘पारू’ म्हणजेच शरयूने चाहत्यांना आज सुखद धक्का दिला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शरयू लग्नाचे फोटो शेअर केले आहेत; जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. पण शरयूचा खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचा आहे तरी कोण? जाणून घ्या…

Aishwarya and Avinash Narkar son amey girlfriend play role in zee marathi lakhat ek amcha dada serial
ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
aashay kulkarni exit from muramba serial
काजल काटे, स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची ‘मुरांबा’ मालिकेतून एक्झिट; म्हणाला, “प्रेक्षकहो…”
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
aishwarya and avinash narkar dances on navara hach hava song
“नवरा हाच हवा…”, अक्षरा-अधिपतीच्या गाण्यावर नारकर जोडप्याचा सुंदर डान्स! शिवानी रांगोळे कमेंट करत म्हणाली…
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Navri Mile Hitlerla fame actor and actress dance on govinda song Angna Mein Baba
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील कलाकारांचा गोविंदाच्या गाण्यावरील जबरदस्त डान्स, वल्लरी विराज म्हणाली, “वेडसर…”
Appi amchi collector fame aparna eka shivani naik shared vat poornima photos on social media
‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अपर्णाने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा – “समुद्राच्या खोल गहिऱ्या तळाशी घेऊन जाणारा प्रवास”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचं केलं कौतुक

गेल्या वर्षी शरयूने ‘पिंकीचा विजय असो’ मालिका सोडल्यानंतर साखरपुडा झाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. १९ सप्टेंबर २०२३ला अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अ‍ॅण्ड एंगेज…गणपती बाप्पा मोरया.” त्यामुळे शरयूचा फक्त साखरपुडा झाल्याचं सगळ्यांना माहित होतं. पण आज तिने लग्न झाल्याचा देखील खुलासा केला.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शरयूने फोटो शेअर करत लिहिलं, “३६५ दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम. आमच्या सुंदर प्रवासाचे एक वर्ष साजरे करत आहोत.” या फोटोमध्ये शरयू व तिचा नवरा शाही लूकमध्ये पाहायला मिळत आहे. शरयू पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत दिसत असून तिचा नवरा पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: “खूपच भारी दिसतायत…”, अविनाश नारकरांच्या डान्स नव्हे तर नव्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष, म्हणाले…

शरयूचा नवऱ्याचं नाव जयंत लाडे असं आहे. जयंत मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे. अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती. याशिवाय उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, संजय जाधव, भरत गणेशपुरे अभिनीत ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील शरयूच्या नवऱ्याने केली होती. या चित्रपटात शरयू सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.