Sharayu Sonawane Dance Video : ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शरयू सोनावणे ( Sharayu Sonawane ) सध्या ‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. १२ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत शरयूने पारूची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. पिंकीप्रमाणेच प्रेक्षक पारूवर देखील भरभरून प्रेम करत आहेत. अशातच पारू म्हणजे शरयू सोनावणेचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून शरयूच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

अभिनेत्री शरयू सोनावणेने ( Sharayu Sonawane ) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पारंपरिक सजलेली शरयू नऊवारी साडीत हलगीवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्स व हावभावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

aishwarya narkar titeeksha tawde dances on kolhapuri halgi
Video : कोल्हापुरी हलगीवर ऐश्वर्या नारकर व तितीक्षा तावडे यांचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “तोड नाही…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Lakhat Ek Amcha Dada nitish chavan dance with co artist on vatanyacha gol dana song
Video: “वाटाण्याचा गोल दाना…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Khushboo Tawde Baby Shower Video Out Titeeksha Tawade share on her youtube video
Video: खुशबू तावडेचं दुसरं डोहाळे जेवण घरीच साध्या पद्धतीने पडलं पार, पाहा व्हिडीओ
namrata sambherao dance on kolhapuri halgi with husband
कोल्हापुरी हलगीवर नम्रता संभेरावने पतीसह धरला ठेका! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आपली संस्कृती…”
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Reshma Shinde and Pooja birari Dance on Vatanyacha Gol Dana song
Video: रेश्मा शिंदे आणि पूजा बिरारीचा आगरी गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

हेही वाचा – Video: श्रीदेवींच्या जयंतीनिमित्ताने लेक जान्हवी कपूरने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, बॉयफ्रेंडसह नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद

शरयूच्या ( Sharayu Sonawane ) या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. “व्वा”, “पारू रॉक्स”, “एनर्जेटिक”, “क्या बात”, “मस्त”, “एकदम कडक डान्स”, “एक नंबर पारू”, “जबरदस्त”, “भारी”, “अगं बाई किती गोड” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “व्वा…शब्दच नाहीयेत”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, सोनावणेचा नाद खुळा. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मी व्हिडीओ सतत बघतं आहे.”

Comments

हेही वाचा – “खड्डे भेदभाव करत नाहीत”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर करत विवेक अग्निहोत्रींचे विधान, म्हणाले…

दरम्यान, शरयू सोनावणेच्या ( Sharayu Sonawane ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, मालिकांसह तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. ‘सूर सपाटा’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती शरयूचा नवरा जयंत लाडेने सांभाळली होती. शरयूचं जयंत लाडेबरोबर ३ एप्रिल २०२३रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. पुण्यातील केरबाची वाडी येथील शरयू व जयंत लग्नसोहळा पार पडला होता.