Paaru fame Shrutkirti Sawant and Purva Shinde dance: झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘पारू’ ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेत काही पात्रे ही सकारात्मक तर काही पात्रे ही नकारात्मक दिसतात. यामध्ये दिशा ही किर्लोस्कर कुटुंबाला त्रास देण्यासाठी कट कारस्थाने करते, तर किर्लोस्करांची सून असलेली दामिनीदेखील तिला स्वत:च्या स्वार्थासाठी मदत करते.

दिशा मात्र दामिनीच्या फायद्यासाठी काम करत नाही, तर स्वत:च्या फायद्यासाठी दामिनीचा वापर करून घेते. दामिनीला किर्लोस्कर कुटुंबात अहिल्याप्रमाणे मान सन्मान, प्रतिष्ठा हवी आहे.

सर्वांनी तिचे ऐकावे असे तिला वाटते. तिला विचारुन निर्णय घेतले जावेत, तिच्या निर्णयांचा आदर व्हावा अशी तिची इच्छा आहे. मात्र, अहिल्यादेवीचे घरातील स्थान प्रबळ असल्याने दामिनीची ही इच्छा पूर्ण होत नाही, त्यामुळे ती दिशाची मदत करताना आणि तिची मदत घेतानादेखील दिसते. अनेकदा दामिनी तिच्या काही गोष्टींमुळे प्रेक्षकांना हसवते.

‘पारू’ मालिकेत दामिनी ही भूमिका अभिनेत्री श्रुतकिर्ती सावंतने साकारली आहे, तर दिशा ही भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदेने साकारली आहे. मालिकेत जरी या अभिनेत्री नकारात्मक पात्रात दिसत असल्या, तरी स्वत:च्या स्वार्थासाठी त्या एकमेकींचा वापर करत असल्याचे दिसत असून त्यांच्यात ऑफस्क्रीन उत्तम बॉण्डिंग आहे. त्या अनेकदा सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

‘पारू’ फेम अभिनेत्रींचा डान्स

आता श्रुतकिर्ती सावंतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्वा शिंदेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघींनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. त्यांनी ‘दिल जाने जिगर तुझपे निसार किया है’ या गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

व्हिडीओच्या शेवटी पूर्वा शिंदे आणि श्रुतकिर्ती सावंत या दोघींचा एक फोटो पाहायला मिळतो, ज्यामध्ये दोघीही पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. दोघींनीही सुंदर साड्या नेसल्या आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना पूर्वा शिंदेने लिहिले, “हे रील पोस्ट करण्याचा आजचा मुहूर्त होता. सखी सावंतजी वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे लिहित पूर्वाने श्रुतकिर्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘दिल जाने जिगर तुझपे निसार किया है’ गाणे ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातील आहे. गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, आता ‘पारू’ मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.