आधी 'हास्यजत्रा' सोडलं, आता 'फू बाई फू'लाही पॅडी कांबळेचा रामराम, कारण आले समोर | Paddy Kamble may leave fu bai fu after Maharashtrachi Hasyajatra new show promo viral nrp 97 | Loksatta

आधी ‘हास्यजत्रा’ सोडलं, आता ‘फू बाई फू’लाही पॅडी कांबळेचा रामराम, कारण आले समोर

अवघ्या महिन्याभरापूर्वी पॅडी कांबळेने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचा निरोप घेतला.

आधी ‘हास्यजत्रा’ सोडलं, आता ‘फू बाई फू’लाही पॅडी कांबळेचा रामराम, कारण आले समोर
त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवायला लावणारा अभिनेता म्हणून पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेला ओळखले जाते. त्याला कायमच त्याच्या विनोदासाठी ओळखले जाते. पंढरीनाथ कांबळेने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात झळकत होता. मात्र आता तो या मालिकेलाही रामराम करणार आहे.  

पंढरीनाथ कांबळे हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याच्या विनोदीबुद्धीचे कायमच कौतुक केले जाते. ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ या मालिकेतील ‘छू’च्या भूमिकेमुळे त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले. गेल्या काही महिन्यांपासून तो सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात झळकत होता. अनेक कलाकारांबरोबर गंमतीजमती करतानाचे व्हिडीओही समोर आले होते.
आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण

मात्र अवघ्या महिन्याभरापूर्वी पॅडी कांबळेने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात झळकला होता. याचे अनेक व्हिडीओही समोर आले होते. यात तो प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवताना सज्ज झाला होता. यानंतर आता तो या कार्यक्रमालाही रामराम करणार आहे. याचे कारणही समोर आले आहे.

पॅडी कांबळे हा लवकरच झी युवा या वाहिनीवरील ‘लाव रे तो व्हिडीओ’ या कार्यक्रमात झळकणार आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमोही समोर आला आहे. पुन्हा झी युवावर व्हिडीओ लागणार आणि टॅलेंट जगात गाजणार! लाव रे तो व्हिडिओ – १६ डिसेंबरपासून शुक्र- शनि. रात्री ९.३० वाजता फक्त, असे झी युवाने केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

त्याबरोबर झी युवाने एक प्रोमोही शेअर केला आहे. या व्हिडीओत पॅडी कांबळे हा विनोदी व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन करत आहे. जर असेल धमक, तर आता मोबाईलवर नाही टीव्हीवर चमक! लाव रे तो व्हिडिओ – १६ डिसेंबरपासून शुक्र- शनि. रात्री ९.३० वाजता. तुमचे मनोरंजक व्हिडीओ आजच 8291 8291 34 या नंबरवर व्हॉटसअ‍ॅप करा, असे आवाहन तो या व्हिडीओद्वारे करत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 11:45 IST
Next Story
Video : अंगावर पीठ ओतलं, ढकलून दिलं अन्…; राखी सावंतचा ‘बिग बॉस’च्या घरात धिंगाणा, “अत्यंत बेकार बाई आहेस” म्हणत अपूर्वा भडकली