Ekta Kapoor : भारतीय टेलिव्हिजनची ‘क्वीन’ एकता कपूरने २५ वर्षांपूर्वी तिच्या पहिल्या के-शो मालिका सुरू केल्या. निर्माती-दिग्दर्शिका तिच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी घर घर की’ या शोसाठी प्रसिद्ध झाली.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ प्रेक्षकांमध्ये, विशेषतः महिला प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या शोची खूप चर्चा झाली आहे. ही एक हिंदी मालिका आहे, जी स्टार प्लसवर ३ जुलै २००० ते ६ नोव्हेंबर २००८ या कालावधीत प्रसारित झाली होती. शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी त्यांच्या बालाजी टेलिफिल्म्स बॅनरखाली या शोची निर्मिती केली होती.

एकताने सासू-सुनेचे असे शो आणले आहेत जे काही लोकांना खूप आवडले, तर काहींना हे शो आवडले नाहीत. आता निर्माते पहलाज निहलानी यांनी एकता कपूरवर भारतीय संस्कृतीला बरबाद केल्याचा आरोप केला आहे.

‘लर्न फ्रॉम द लेजेंड’ या यूट्यूब चॅनेलवरील अलीकडेच झालेल्या संवादात पहलाज निहलानी यांनी एकतावर तिच्या शोमध्ये दोन बायकांची संकल्पना दाखवल्याबद्दल आरोप केले. पण, त्यांनी असेही म्हटले की तिच्या शोमध्ये महिलांना अनेक वेळा लग्न करताना दाखवले जाते. ते म्हणाले, ‘एकता कपूर द ग्रेट… म्हणजे पुरुषांना दोनदा लग्न करण्याची परवानगी नाही, पण ते शोमध्ये महिलांना तीन वेळा लग्न करायला लावतात, त्यांनी आपली संस्कृती बरबाद केली आहे.’

पहलाज असेही म्हणाले की, येथे आरआरआरसारखे चित्रपट बनवले जात आहेत, ते सर्व रामायण आणि महाभारतावर आधारित आहेत, कल्कीदेखील, त्याचा शेवट महाभारतासारखा आहे. लोक भारतीय संस्कृतीने प्रभावित आहेत; परंतु आपल्याला जबरदस्तीने दाखवले जात आहे की एक महिला तीन पुरुषांशी लग्न करू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलाज यांच्या आधी, मुकेश खन्ना एकदा सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत एकताला तिच्या ‘कहानी हमारे महाभारत की’ शोबद्दल म्हणाले होते, “जर तुम्ही एकता कपूरच्या शोमध्ये पांडव पाहिले तर ते मॉडेलसारखे दिसतात. भीम अजिबात भीमसारखा दिसत नाही आणि अर्जुनही नाही. जर तुम्ही ते सर्व एकत्र पाहिले तर तुम्हाला कळणार नाही की कोण कोणती भूमिका साकारत आहे.”