टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई नेहमीच चर्चेत असते. चाहते तिच्या वैयक्तिक आणि प्रेम जीवनाबद्दल अनेकदा चर्चा करतात. ‘उतरन’ या मालिकेत तपस्या ठाकूरची भूमिका साकारल्यानंतर रश्मी घराघरात लोकप्रिय झाली. अलिकडेच एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिच्या पहिल्या मोडलेल्या लग्नाबद्दल भाष्य केलं. त्यानंतर, सोशल मीडिया युजर्स रश्मीच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

दिवंगत अभिनेत्री शेफाली जरीवालाचा पती आणि टीव्ही अभिनेता पराग त्यागी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पत्नीच्या निधनानंतर तो खूप निराश झाला होता. पण स्वतःला सावरून आता त्याने नवीन सुरुवात केली आहे. याचदरम्यान, एका युजरने म्हटलं की परागने रश्मी देसाईशी लग्न करावं. यानंतर परागने त्या युजरला दिलेलं उत्तर चर्चेत आहे. पराग त्यागी काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.

पराग त्यागीने युजरला सुनावलं

आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत रश्मी देसाईने तिच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या मुलाखतीबद्दल लोक प्रतिक्रिया देऊ लागले. पण यापैकी एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या युजरने पराग त्यागीला टॅग केलं आणि रश्मी देसाईशी लग्न करण्याची मागणी केली. अभिनेता पराग त्याला म्हणाला, “बेटा, ती माझी बहीण आहे, आणि फक्त रश्मी नाही, तर सर्व महिला माझ्या बहिणी आहेत.” परागचे उत्तर वाचून लोक त्याचे कौतुक करत आहेत आणि अशी कमेंट करणाऱ्या युजरला ट्रोल करत आहेत. पराग त्यागीची पत्नी शेफाली जरीवाला हिचं काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Award Banner

रश्मी देसाईचं लग्न व घटस्फोट

रश्मी देसाईचं लग्न अभिनेता नंदिश संधूशी झालं होतं. दोघांची भेट ‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर झाली होती. तिथे ते प्रेमात पडले आणि त्यांनी १२ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केलं. लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच त्यांच्यात वाद होऊ लागले. रश्मीने एका मुलाखतीत सांगितले होते की, नंदीश तिच्याबद्दल खूप ‘पझेसिव्ह’ होता आणि त्याचा हा स्वभाव तिला आवडत नव्हता. रश्मीच्या मते, नंदीशच्या आयुष्यात इतर अनेक मुली (मैत्रिणी) होत्या, ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. नंदीशने रश्मीच्या अतिसंवेदनशील स्वभावाला आणि त्यांच्यातील विचारांच्या फरकाला घटस्फोटासाठी जबाबदार धरले होते.

दोघांनी आपले नाते वाचवण्यासाठी ‘नच बलिये ७’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. तिथे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या आणि रश्मीच्या ‘मिसकॅरेज’ (गर्भपात) बद्दलही भाष्य केले होते. मात्र, परिस्थिती सुधारली नाही आणि अखेर २०१६ मध्ये त्यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला. त्यानंतर रश्मीचं नाव अरहान खान आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्याशी जोडलं गेलं होतं.