Pathrakhin fame Gauri Ingawale And Deepti Lele dance Video: सध्या सोशल मीडियाचा वापर जवळजवळ सगळेच करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील व्यक्तींशी जोडता येते. इतकेच नाही तर विज्ञान, तंत्रज्ञान, ऐतिहासिक, भौगोलिक, प्राण्यांबद्दलचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जगभरातील प्रसिद्ध ठिकाणांची, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची, तसेच संस्कृतीची माहिती मिळते, जाणून घेता येते. याबरोबरच, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंच्या जाहिरातीदेखील केल्या जातात. तसेच, मनोरंजनही केले जाते.
कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विविध रील्स शेअर करत ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. काही वेळा ते ट्रेंडिंग ऑडिओवर व्हिडीओ शेअर करतात, काही वेळा विनोदी रील्स शेअर करतात तर अनेकदा डान्स व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांची मने जिंकतात.
दीप्ती लेले व गौरी इंगवले यांचा ‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ जबरदस्त डान्स
आता ‘पाठराखीण’ मालिकेतील गौरी इंगवले व दीप्ती लेले यांचा एक डान्स व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी ‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ या सध्या ट्रेंड होत असलेल्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांची एनर्जी, त्यांच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत आहेत. याबरोबरच त्यांचा लूकही चर्चेत आहे.
दीप्ती व गौरी या दोघींनीही नऊवारी साड्या नेसल्या आहेत. गौरीने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे, तर दीप्तीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. हातात बांगड्या, गळ्यात मोजके दागिने आणि नाकात नथ घातली आहे. याबरोबरच त्यांनी गॉगल लावला आहे. त्यांचा हा पारंपरिक लूक लक्ष वेधत आहे. त्या दोघीही खूप सुंदर दिसत आहेत.
गौरीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “वाह”, “भारी”, “कडक”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
या मालिकेतील कलाकार विविध डान्स व्हिडीओमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गौरी इंगवले, प्राजक्ता गायकवाड, शुभंकर तावडे, आशय कुलकर्णी हे कलाकार बॉलीवूड, मराठी, पंजाबी तसेच ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतात.
दरम्यान, मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बहिणींचे प्रेम, एकमेकांबद्दल असलेली काळजी, मैत्री या सगळ्या गोष्टींमुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत आहे.
