एकाचवेळी दोन व्यक्तींना केलं होतं डेट, आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला साखरपुडा | pavitra punia eijaz khan engaged celebrity couple romantic photos goes viral on social media see details | Loksatta

एकाचवेळी दोन व्यक्तींना केलं होतं डेट, आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला साखरपुडा

एजाज खान व पवित्रा पुनिया गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एकाचवेळी दोन व्यक्तींना केलं होतं डेट, आता सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला साखरपुडा
एजाज खान व पवित्रा पुनिया गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हिंदी ‘बिग बॉस’च्या १४व्या पर्वामुळे एजाज खान व पवित्रा पुनिया नावारुपाला आले. एजाज-पवित्रा एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाले असल्याचं ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पाहायला मिळालं. एजाज एलिमिनेट होण्यापूर्वीच पवित्रा ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर गेली. त्यानंतर फॅमिली स्पेशल एपिसोडमध्ये ती एजाजला भेटायला आली. यावेळी दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सगळ्यांसमोर उघड झालं. आता एजाज-पवित्राने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

गेल्या काही वर्षांपासून एजाज-पवित्रा एकमेकांना डेट करत आहेत. ‘बिग बॉस’पासूनच या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. आता एजाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचाही रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

एजाजने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो पवित्राला अंगठी घालताना दिसत आहे. “आपण योग्य वेळेची वाट पाहत राहिलो तर ती वेळ कधीच येणार नाही. तू माझ्याशी लग्न करशील का? तिने होकार दिला.” असं एजाजने पवित्राबरोबर फोटो शेअर करत म्हटलं आहे. दोघांचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – Video : “त्यांचा आदर करा” वडिलांबाबत ऐकताच अभिषेक बच्चनला राग अनावर, शो सोडून निघून गेला अन्…

याआधी पवित्राचं खासगी आयुष्य चांगलंच चर्चेत होतं. एकाच वेळी आपण दोन व्यक्तींना डेट करत असल्याचं पवित्राने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सांगितलं होतं. एजाजबरोबर पवित्राची जवळीक वाढल्यानतंर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. आता लवकरच दोघं लग्न करणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सुप्रसिद्ध मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

संबंधित बातम्या

“निलेश साबळेने माझ्या लेकीचा फोटो…” स्नेहलता वसईकरने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सांगितला ‘तो’ प्रसंग
“दिग्दर्शकाने माझ्याशी शारीरिक संबंध…”; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
“मी स्वतःला पात्र समजत नाही…” ‘मृदगंध पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर श्रेया बुगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष
Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा साखरपुडा, लवकरच होणार विवाहबद्ध

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
सुपरस्टार चिरंजीवी यांनी चित्रपट महोत्सवात चाहत्यांना दिलं मोठं वचन; म्हणाले “मी चित्रपटसृष्टी…”
पुणे शहरात रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल; मागणी पूर्ण होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा निर्धार
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बहिणीला तेलंगणात अटक, गाड्यांचीही जाळपोळ; काय आहे प्रकरण?
निधीअभावी पुणे जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक अभिलेख कक्षाचे काम रखडले