गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. काही कलाकार वाढदिवसाचे औचित्य साधत प्रेमाची कबुली देताना दिसतात. मुग्धा वैंश्यपायन, प्रथमेश लघाटे, सई ताम्हणकर, अनिश जोग यांच्यापाठोपाठ आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आरती मोरेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक फोटो पोस्ट केला आहे. यात तिने वाढदिवसाचे औचित्य साधत तिच्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र तिच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “मी त्यातून कमबॅक केलं होतं, पण…” अखेर ‘संजना’ फेम अभिनेत्रीने सांगितलं ‘आई कुठे काय करते’ सोडण्यामागचे खरं कारण, म्हणाली “तो निर्णय…”
“”असणं ” हा शब्द मानवी रुपात आला तर त्याला तू तुझ्याशिवाय दुसरा पर्याय ठेवणार आहेस का?? कसं जमत तुला? कसं? Thank You वगैरे खूप formal नको बोलायला आता मी! आय लव्ह यू जानेमन, वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे आरती मोरेने म्हटले आहे.
अक्षय पाटील हा गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत सक्रीय आहे. दशमी क्रिएशन्सच्या निर्मिती संस्थेसाठी तो काम करतो. आरती आणि अक्षय हे दोघेही कोलेजपासूनचे मित्र आहेत. ते दोघेही एकमेकांसाठी पोस्ट शेअर करत असतात. पण आता आरतीच्या पोस्टने चर्चांना उधाण आलं आहे.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
दरम्यान आरती मोरेनेही बऱ्याच मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. ती ‘जय मल्हार’, ‘अस्मिता’, ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘गुलमोहर’ या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली. ‘दादा एक गूड न्यूज आहे’ या नाटकातली तिची भूमिका विशेष गाजली. आरतीला गेल्या वर्षी ‘कलादर्पण २०२२’चा सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ‘लोकमान्य’ मालिकेत यशोदाबाई आगरकर या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. सध्या आरती ही ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत पिंकीची भूमिका साकारत आहे.