‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिका चांगली गाजली होती. जानेवारी २०२३मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. दीड वर्ष ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेने अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील सावी आणि अर्जुनची जोडी खूप लोकप्रिय झाली.

अभिनेता इंद्रनील कामतने अर्जुन आणि अभिनेत्री रसिका वाखरकरने सावी ही भूमिका उत्कृष्टरित्या साकारल्यामुळे प्रेक्षकांनी दोघांना डोक्यावर घेतलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. मालिका संपून काही महिने झाले असूनही मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. नुकतीच इंद्रनील कामत आणि तेजश्री प्रधानची ग्रेट भेट झाली. याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Janhvi Kapoor
‘लवयापा’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जान्हवी कपूरने पोस्ट केले खुशीबरोबरचे सुंदर फोटो
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून तेजश्री प्रधान कधी नाटकाचा आस्वाद घेताना तर कधी ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. नुकतीच तिने इंद्रनील कामतची भेट घेतली. याचा फोटो इंद्रनीलने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं की, राहूल, जावा जीप…विचारमंथन आणि बरंच काही… तेजश्री, तू खूप दयाळू आहेस. या दिवसासाठी हे खास गाणं. इंद्रनीलची हीच स्टोरी तेजश्रीने शेअर करत हसण्याचे इमोजी त्यावर पोस्ट करत लिहिलं आहे की, पहिला शब्द…दोघांच्या या भेटीचा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान, इंद्रनील कामतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’नंतर लवकरच तो नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात इंद्रनील झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो शेअर करत इंद्रनीलने ही आनंदाची बातमी दिली होती. तसंच तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाला अजूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ती आता कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader