आजी-आजोबा आणि नातवाचं नातं हे काही औरच असतं. आजी-आजोबापासून नात्याची, संस्काराची जडणघडण होतं असते. खरं म्हणजे नातवाचे पहिले मित्र हे आजी-आजोबाचं असतात. त्यामुळे हे नातं शेवटपर्यंत घट्ट असतं. असंच घट्ट नातं ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ फेम अभिनेता इंद्रनील कामतचं आपल्या आजीबरोबर होतं. त्यामुळेच आजीच्या वाढदिवशी त्याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली होती.

अभिनेता इंद्रनील कामतने आजीबरोबरचे काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली होती. या फोटोंमधून त्याने आजीबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. हे फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “पुनर्जन्म आहे का? पुन्हा ये. एकदाच भेट. न बोललेलं, न सांगितलेलं सर्व काही सांगुन टाकू आणि हे ही अर्धवर्तुळ पूर्ण करून टाकू…आज तिचा वाढदिवस…अनित्यं…#माझीगंगू”

हेही वाचा – ‘शिवा’प्रमाणेच श्रुती मराठेच्या ‘भूमिकन्या’ नव्या मालिकेच्या पहिल्या भागाचं प्रेक्षपण रखडलं, प्रेक्षकांची मागितली माफी

हेही वाचा – कालीन भैय्या आणि गुड्डू पंडितची आतुरतेने पाहताय वाट, तर ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये, शोधा

इंद्रनील कामतच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “ती सर्वात अभिमानी व्यक्ती असावी.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे मात्र नक्की आहे की, जिथून आणि जेव्हा तुला पाहत असतील तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत असेल.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील.” अशा अनेक प्रतिक्रिया इंद्रनील कामतच्या पोस्टवर चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्रीचं सहा वर्षांनंतर मराठी मालिकाविश्वात जबरदस्त कमबॅक, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत झळकणार

दरम्यान, इंद्रनील कामतची मुख्य भूमिका असलेली ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत इंद्रनीलने साकारलेला अर्जुन आता घराघरात पोहोचला आहे. त्याच्या कामाचं कौतुक होतं आहे. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत इंद्रनीलसह अभिनेत्री रसिका वाखरकर, हरीश शिर्के, गौरव मालनकर असे बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.