scorecardresearch

Shark Tank India 2: सडेतोड उत्तराने विनिता सिंगच्या उत्पादनांना चॅलेंज करणाऱ्या स्पर्धकाचं नमिता थापरकडून कौतुक, म्हणाली…

विनिता सिंग ही ‘शुगर कॉस्मॅटिक्स’ या ब्रॅंडची संस्थापक आहे. या ब्रॅंडच्या माध्यमातून ब्युटी प्रोडक्ट्स तयार केली जातात.

Shark Tank India 2: सडेतोड उत्तराने विनिता सिंगच्या उत्पादनांना चॅलेंज करणाऱ्या स्पर्धकाचं नमिता थापरकडून कौतुक, म्हणाली…

‘शार्क टॅंक इंडिया’चा पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता नुकतंच या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसरं पर्वही प्रचंड गाजत आहे. या कार्यक्रमात नवीन व्यवसायिक त्यांच्या बिझनेसच्या कल्पना घेऊन जज शार्क्सना सांगतात आणि शार्क्सना जर त्यांच्या व्यवसायात रस वाटलं तर ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात. यावेळी या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धकही जज शार्क्सच्या प्रश्नांची सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. आता ‘शुगर कॉस्मॅटिक्स’ या ब्रॅंडची संस्थापक विनिता सिंगच्या प्रश्नावर एका स्पर्धकाने दिलेल्या उत्तरावर नमिता थापर मोहित झाली.

या पर्वात पियुष बन्सल, विनिता सिंग, नमिता थापर, अनुपम मित्तल आणि अमन गुप्ता हे शार्क्सच्या खुर्चीत बसलेले आहेत. नवीन व्यावसायिकांनी मांडलेल्या व्यवसायांच्या कल्पनांवर प्रश्न विचारात ते त्यांची चांगलीच परीक्षा घेताना दिसतात. अनेकदा ते स्पर्धकांना शब्दातही पकडतात. त्यामुळे सहभागी स्पर्धांची चांगलीच भंबेरी उडते. पण नुकत्याच झालेल्या भागात काहीतरी वेगळंच चित्र दिसलं.

आणखी वाचा : Shark Tank India 2: कार्यक्रमात लाखांचे व्यवहार करणाऱ्या शार्क्सना कोट्यवधींचा फटका? प्रसिद्ध लेखकाची खळबळजनक पोस्ट

‘डेली डम्प’ या ब्रँडच्या संस्थापिका पूनम कस्तुरी ‘शार्क टॅंक’मध्ये सहभागी झाल्या होत्या. हा ब्रँड कंपोस्ट बिन आणि नॉन-टॉक्सिक वॉशिंग-क्लीनिंग उत्पादने करतो. त्यांनी प्रत्येक शार्कच्या प्रश्नाला अत्यंत चतुराईने उत्तर दिलं. विनिताने जेव्हा पूनम यांच्या ब्रँडचा पॉकेट डिटर्जंट हातात घेऊन पाहिला तेव्हा तिने त्यांना विचारलं, “यात रिठा वापरलं आहे का? जे आपण केसांच्या संबंधित उत्पादने तयार करताना वापरतो?” त्यावर पूनम म्हणाल्या, “हो. हानिकारक नसलेले पदार्थ आमच्या प्रॉडक्ट्समध्ये आम्ही वापरतो. कारण केमिकल असलेल्या वस्तू आपण घरी घेऊन येत असतो. तुम्हाला तर माहीतच असेल कारण तुम्ही त्याच क्षेत्रात काम करता.”

हेही वाचा : Shark Tank India 2: प्रसिद्ध लेखकाकडून नमिता थापरची अनन्या पांडेशी तुलना, म्हणाला, “तिचे वडील…”

तिने दिलेल्या या उत्तरावर नमिता फारच भारावून गेली. ती म्हणाली, “जेव्हा स्पर्धक आमच्यासमोर उभे असतात तेव्हा ते आम्हाला बघून घाबरतात. इथे तर तुम्ही सगळ्याच शार्कची शाळा घेतलीत. तुमच्या या आत्मविश्वासाबद्दल तुमचं अभिनंदन.” आता नमिताने केलेल्या या कौतुकाने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 19:06 IST

संबंधित बातम्या