scorecardresearch

तुनिषा आत्महत्या प्रकरणात नवं वळण; अभिनेत्रीचा फोन अनलॉक होताच आले शिझानच्या कुटुंबियांचे मेसेज

मोबाईलमधून माहिती काढण्याचा प्रयत्न सध्या पोलिस करत आहेत

तुनिषा आत्महत्या प्रकरणात नवं वळण; अभिनेत्रीचा फोन अनलॉक होताच आले शिझानच्या कुटुंबियांचे मेसेज
फोटो : सोशल मीडिया

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येचे प्रकरण रोज नवं वळण घेत आहे. तुनिषाच्या एक्सबॉयफ्रेंड म्हणजेच शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. शिझानने तुनिषाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असं तिच्या घरच्यांचं म्हणणं आहे. शिझानच्या बहिणींनी मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्ट केलं आहे.

याबरोबरच तुनिषाचा मोबाईल अनलॉक करण्यात पोलिसांना यश मिळालं आणि त्या मोबाईलमधून माहिती काढण्याचा प्रयत्न सध्या पोलिस करत आहेत. तुनिषाचा फोन अनलॉक करण्यातही पोलिसांनी अॅपल कंपनीच्या अधिकृत लोकांना बोलावलं होतं.

आणखी वाचा : तुनिषाच्या आत्महत्येच्या दिवशी सेटवर नेमकं काय घडलं? चौकशीदरम्यान शिझान खानचा खुलासा

फोन सुरू होताच तुनिषाच्या मोबाईवर तिची आई आणि शिझानच्या कुटुंबियांचे मेसेज यायला सुरुवात झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या माहितीच्या आधारावर पोलिस शिझानच्या कुटुंबियांचीसुद्धा चौकशी करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकतंच शिझानच्या फोनमधून त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडबद्दलची माहिती समोर आली होती.

चौकशीदरम्यान शिझान आणि तुनिषा यांच्यात लंच ब्रेक दरम्यान संभाषण झाल्याचं शिझानने कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण अद्याप शिझान आणि तुनिषा यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं आणि नेमकं त्यानंतर काय घडलं याविषयी शिझानने खुलासा केलेला नाही. याबरोबरच पोलिस सध्या शिझान आणि तुनिषा यांच्यात झालेल्या चॅटिंगचाही तपास करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 20:33 IST

संबंधित बातम्या