पूजा बिरारी व सोहम बांदेकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. पूजा बिरारी व सोहम बांदेकरची लव्ह स्टोरी, त्यांच्या लग्नातील फोटो या सर्व गोष्टी अनेक दिवस चर्चेचा विषय बनला होता. अशातच आता पूजाने संसार, सासर, करिअर आणि सोहमलबद्दल घरी सांगितल्यानंतर आई-वडील व भावाची प्रतिक्रिया याबद्दल सांगितलं आहे.
सोहम व पूजा यांनी डिसेंबर २०२५मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. मराठी इंडस्ट्रीत मोठं नाव असलेल्या बांदेकर कुटुंबाची सून झाल्यानंतर पूजा बिरारी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. पण अनेकांना माहीत नसेल की सोहमबरोबर लग्न करण्यापूर्वी तो कसा आहे हे जाणून घेणं आणि पूजाच्या लग्नाची जबाबदारी तिच्या वडिलांनी तिच्या भावावर सोपवली होती. पूजाने याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी तिने सोहमला भेटण्यासाठी तिच्या भावाने त्याच्याशी संपर्क केल्यानंतरची त्याची प्रतिक्रिया आणि त्यांची भेट याबद्दल सांगितलं आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिच्या भावाचं तिच्या आयुष्यातील महत्त्व, आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीत तिचा भाऊ तिच्याबरोबर असतो असं सांगितलं आहे. पूजाने यावेळी तिचा मोठा भाऊ तुषार बिरारी जर्मनीत असतो असं सांगितलं आहे. यावेळी तिला तिच्या लग्नाच्यावेळी भावाची काय प्रतिक्रिया होती असं विचारण्यात आलं. त्यावर तिने तेव्हासुद्धा तिचा भाऊच सगळं नीट आहे की नाही हे पाहण्यासाठी आला होता आणि त्याच्यावरच तिच्या बाबांनी तिच्या लग्नाची जबाबदारी सोपवली होती असं सांगितलं.
‘अशी’ होती सोहम व पूजाच्या भावाची पहिली भेट
पूजा तिचा मोठा भाऊ तुषार बिरारी व सोहम यांच्याबद्दल सांगताना म्हणाली, “लग्नाच्यावेळीसुद्धा असंच झालं होतं की तो अचानक गणपतीत घरी आला होता आणि तेव्हाच मी घरी सोहमबद्दल सांगितलं होतं आणि बाबांनी त्याच्यावरच जबाबदारी सोपवली होती की तू एक काम कर तू त्या मुलाला कॉफीसाठी वगैरे जाऊन भेट मग मी सोहमलासुद्धा सांगितलेलं की दादाला तुला भेटायचं आहे तर सोहम म्हणाला की कॉफीसाठी वगैरे कशाला घरीच भेटू आपण. मग दादाच आला होता त्यांने घरच्यांना सांगितलं की छान आहे सगळं वगैरे. आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे तेव्हासुद्धा दादाच होता.”
पूजाने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. पूजाने यावेळी तिच्या सर्व मालिकांच्या ऑडिशनलासुद्धा तिचा दादा तिच्याबरोबर होता आणि त्यामुळे तिची ऑडिशन झाली असंही सांगितलं आहे.
