Pooja Sawant & Siddhesh Chavan : ‘महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री पूजा सावंत फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकली. पूजाच्या पतीचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. लग्नानंतर पूजा ऑस्ट्रेलिया-भारत असा प्रवास करत असते. गेल्या काही महिन्यात सिनेमांचं प्रदर्शन, प्रमोशन यामुळे पूजा भारतातच आहे. आता पूजाचे नवरोबा अनेक महिन्यांनी भारतात आले आहेत आणि हे दोघंही एकत्र फिरायला गेलेत. सिद्धेशबरोबरचा क्युट सेल्फी फोटो शेअर करत पूजाने ‘Vacation Mode On’ असं कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.

निसर्गरम्य वातावरणात पूजा सध्या Vacation एन्जॉय करतेय. अभिनेत्रीने शेअर केलेल्या आणखी एका फोटोत निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सुंदर स्विमिंग पूल आणि तिच्या लक्झरी रूमची झलक पाहायला मिळतेय. पूजाने शेअर केलेले हे गोड फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.

Pooja Sawant & Siddhesh Chavan
पूजा सावंतने शेअर केले खास फोटो

पूजा सावंतचा संसार लाँग डिस्टन्स सुरू आहे. याबद्दल काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “माझा संसार टिपिकल असा नाहीये. कारण, अर्थात आमचा संसार लाँग डिस्टन्स सुरू आहे. आम्ही भेटण्यासाठी अशी वेळ वगैरे काहीच ठरवलेलं नसतं की, या-या महिन्यात आपण भेटायचंय. जेव्हा इथे माझं कोणतंच काम सुरू नसतं किंवा काम कमी असतं…तेव्हा मी ऑस्ट्रेलियाला जाऊन माझ्या नवऱ्याला भेटते. त्याच्या प्रोफेशनमध्ये त्याला फार सुट्ट्या मिळत नाहीत. त्यामुळे तो फार प्रवास करू शकत नाही. नशिबाने आपलं प्रोफेशन असं आहे की, एखादी सुट्टी मिळू शकते. याशिवाय दोन प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये आपल्याला ब्रेक सुद्धा मिळतो. त्यामुळे माझं ऑस्ट्रेलियाला येणं-जाणं जास्त असतं. आता हळुहळू आम्हाला सगळं जमतंय.”

Pooja Sawant & Siddhesh Chavan vacation
पूजा सावंतने शेअर केले खास फोटो

“मी लग्नानंतर संसारासाठी जाणीवपूर्वक वेळ दिला. पण, मला इथल्या सुद्धा सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या होत्या. पहिलं वर्ष माझ्यासाठी आणि सिद्धेशसाठी खूप कठीण होतं. पण, आता आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करतोय.” असं पूजाने सांगितलं.

Pooja Sawant & Siddhesh Chavan
पूजा सावंतने शेअर केले खास फोटो

दरम्यान, पूजा-सिद्धेशचं अरेंज मॅरेज आहे. सुरुवातीला पूजा-सिद्धेशची एकमेकांशी छान ओळख झाली. दीड वर्षे दोघंही संपर्कात होते. हळुहळू प्रेमात पडले आणि एकमेकांना समजून घेऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.