scorecardresearch

MTV Roadies 19 : “तुमच्यातल्या रोडीला जागं करा”, धुमाकूळ घालायला येतोय ‘रोडीज’चा नवा सीझन

‘रोडीज : कर्म या कांड’ या नव्या सीझनच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

Roadies 19
फोटो : व्हिडिओतून स्क्रीनशॉट

MTV Roadies 19 Teaser : एमटीव्हीचा सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो ‘रोडीज’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रोडीज लवकरच एका नवीन सीझनसह टेलिव्हिजनवर परत येणार आहे. साहस आणि थरारावर आधारित या टीव्ही शोचा १९ वा सीझन लवकरच एमटीव्हीवर पुन्हा पाहायला मिळणार आहे. २०२२ मध्ये संपलेल्या या शोच्या १८ व्या सीझननंतर आता त्याच्या पुढील सीझनची तयारी सुरू झाली आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा त्याचा नवा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘रोडीज : कर्म या कांड’ या नव्या सीझनच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा MTV शो तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. टीझर रिलीज करताना, निर्मात्यांनी चाहत्यांना सांगितले आहे की ‘रोडीज १९’ च्या ऑन-ग्राउंड ऑडिशन्स लवकरच सर्व शहरांमध्ये सुरू होतील. टीझर रिलीज झाल्यामुळे आता ऑडिशन्सला कधी सुरुवात होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

आणखी वाचा : “शाहरुख खान अपयशी…” अनुभव सिन्हा यांनी सांगितलं ‘रा.वन’ चित्रपट फ्लॉप होण्यामागील कारण

लवकरच यासंदर्भात निर्माते अपडेट्स देतील. ‘रोडीज १८’चं शूटिंग दक्षिण आफ्रिकेत झालं होतं. त्या सीझनचं सूत्रसंचालन सोनू सूदने केलं होतं. त्यामुळे आता ‘रोडीज १९’बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा टीझर पाहून लोकांनी त्याखाली भरपूर कॉमेंट करत त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी एमटीव्ही आणि निर्मात्यांचे आभारही मानले आहेत.

‘रोडीज १८’मध्ये आशीष आणि नंदिनीमध्ये चांगलीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ‘रोडीज’च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन विजेते घोषित करण्यात आले. नंदिनी आणि आशीष जिंकल्यानंतर त्यांना प्रत्येकी १० लाख रुपये, ट्रॉफी अन् काही खास भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. आता या शोच्या नव्या पर्वात आणखी वेगळं काय बघायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. आधीच्या सीझनप्रमाणेच या सीझनचंशी सूत्रसंचालन सोनू सूद करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 10:50 IST

संबंधित बातम्या