हल्ली सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे रील, फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक कलाकारांच्या रीलसुद्धा असतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सहकलाकारांबरोबरच्या, कुटुंबीयांबरोबरच्या रील सोशल मीडियावर पोस्ट करत असतात ज्यांच्यावर त्यांचे चहाते लाईक आणि कमेंट्स करत प्रतिसाद देत असतात. मालिका विश्वात काम करणारे अनेक कलाकार तर प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्यासाठीसुद्धा काही वेळेला अशा रील पोस्ट करत असतात. अशातच नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अभिनेत्री गौरी इंगवले यांनी एक डान्स रील शेअर केली आहे.
गेले काही दिवसांपासून प्राजक्ता गायकवाड आणि गौरी इंगवले यांच्या अनेक रील आणि फोटो पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे त्यांची ‘पाठराखीण’ ही नवीन मालिका. दोघी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये असून यामधून दोघी ऑन स्क्रीन बहिणींच्या भूमिका साकारत आहेत. त्यामुळे त्यांची ही जोडी त्यांच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडत आहे.
अक्षय कुमारच्या गाण्यावर थिरकल्या प्राजक्ता-गौरी
दोघी अनेकदा एकमेकींबरोबरचे रील शेअर करत असतात दोघींनाही नृत्याची प्रचंड आवड असल्यामुळे अलीकडच्या काळात त्यांनी बऱ्याचदा एकमेकींबरोबरच्या डान्स रील पोस्ट केले आहेत. अशातच आतासुद्धा नुकतीच दोघींनी भर पावसात एकत्र डान्स करत असतानाचा रील व्हिडिओ पोस्ट केला आहे. दोघींनी नुकतंच इंस्टाग्रामवर अक्षय कुमारच्या ‘पटियाला हाऊस’ चित्रपटातील ‘लॉन्ग द लष्करा’ या गाण्यावरील रील शेअर केली आहे.
यामध्ये दोघींनीही लाल रंगाचा कुर्ता परिधान केला असून दोघी पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहेत. प्राजक्ता आणि गौरी या व्हिडिओमध्ये भर पावसात या गाण्यावर थिरकत वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहेत. या व्हिडिओखाली अनेकांनी प्राजक्ताच्या नृत्याचं कौतुक करत कमेंट केल्या आहेत. मालिकेतील त्यांचा सहकलाकार शुभंकर तावडेनेसुद्धा यावर कमेंट केल्याचं पाहायला मिळतं.
प्राजक्ताने या व्हिडिओला मालिकेमुळे आम्ही दोघी बहिणींच्या भूमिका साकारत आहोत, पण यामुळे मात्र आमच्यामध्ये चांगली मैत्री झाली आहे असं या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शन मधून म्हटलं आहे. व्हिडिओखाली केलेल्या कमेंटमधून तिने सेटवर शूटिंगमधून वेळ मिळाला की त्या दोघी डान्स रील बनवतात असं म्हटलं आहे.
