Prajakta Gaikwad : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड २ डिसेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकली. प्राजक्ताच्या पतीचं नाव शंभुराज खुटवड असून ते बिझनेसमन आहेत. या दोघांच्या विवाहसोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. लग्नानंतर प्राजक्ता व शंभुराज जोडीने जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी सुद्धा गेले होते. आता अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या एका खास व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने सासरी पहिला पदार्थ बनवला आहे, हा पदार्थ कोणता आहे पाहुयात…

प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाची गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. अभिनेत्रीचा साखरपुडा ऑगस्ट २०२५ मध्ये पार पडला. यानंतर केळवण, घाणा भरण्याचा कार्यक्रम, मेहंदी, हळद, संगीत असे लग्नाआधीचे सगळे कार्यक्रम पार पडल्यावर अभिनेत्री २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकली. प्राजक्ता व शंभुराज यांच्या शाही विवाहसोहळ्यातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता प्राजक्ताने लग्नानंतर सासरी पहिल्यांदाच एक खास पदार्थ बनवल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नानंतर सासरी गेल्यावर नव्या नवरीने सर्वांसाठी गोड पदार्थ बनवायचा अशी परंपरा आहे. यानुसार प्राजक्ताने खुटवड कुटुंबीयांसाठी खास गुलाबजाम बनवले.

Award Banner

प्राजक्ताला गुलाबजाम करताना पती शंभुराज सुद्धा मदत करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“अगं किती गोड”, “आमच्या दाजींना लावलं का कामाला”, “एक नंबर जोडी आहे ताईसाहेब…कुणाची नजर न लागो”, “अन्नपूर्णा आहेत आमच्या ताई…मस्त बेत केला”, “खूप मस्त प्राजक्ता”, “पहिला पदार्थ ताईंना बनवला आणि दाजी खूश झाले”, “प्राजक्ता ताई आहेच गोड” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, प्राजक्ताशी लग्न करण्याआधी शंभुराज यांनी पूर्णपणे नॉनव्हेज खाणं बंद केलं आहे. लग्नाआधी अभिनेत्रीने त्यांच्यासमोर तशी अट ठेवली होती. शंभुराजने नॉनव्हेज सोडून माझ्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाइज केलंय असं प्राजक्ता कायम सांगते.