Prajakta Gaikwad shares video With Coctors of Pathrakhin serial: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या ‘पाठराखीण’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत तिने प्राजक्ता ही भूमिका साकारली आहे. घरच्यांसाठी त्याग करणारी, बहिणीवर प्रचंड प्रेम असणारी अशी ही प्राजक्ता आहे. ती तिच्या या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. पण, त्याचबरोबर ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात असते.

प्राजक्ता अनेकदा ‘पाठराखीण’ या मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करते. कधी ती सहकलाकारांबरोबर डान्स करताना दिसते, कधी या व्हिडीओंमधून सर्व कलाकारांची मजा पाहायला मिळते. आता प्राजक्ताने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईने मालिकेच्या सेटवर एक खास पदार्थ पाठवला आहे.

“खूप जबरदस्त…”

व्हिडीओच्या सुरुवातीला प्राजक्ता आणि तिचा सहकलाकार शुभंकर तावडे दिसतो. तो म्हणतो की, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर मालिकेतील सर्व कलाकार दिसतात. सर्वजण हॅपी बर्थडे असे म्हणत प्राजक्ताला शुभेच्छा देतात. त्यानंतर प्राजक्ता सर्वांना भात कसा झाला आहे याबद्दल विचारते. त्यावर सगळे छान, कमाल असे म्हणत कौतुक करतात.

व्हिडीओमध्ये पुढे शुभंकर म्हणतो, “खूप जबरदस्त मसालेभात घेऊन आली आहे. मागच्या वेळी काकूंनी मिसळ बनवली होती. आज भात बनवला आहे. तो क्लासिक आहे, त्यामुळे सगळ्यांच्या ताटात बघा, रोज जे चपाती, भाकरी खातात ते सगळे भात खात आहेत.”

हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने, “आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आईने सगळ्या युनिटसाठी अप्रतिम स्पेशल भात पाठवला”, अशी कॅप्शन लिहिली आहे.

प्राजक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तृप्ती देसाई, किशोरी शहाणे यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत; तर चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, प्राजक्ताच्या सोशल मीडियावरील व्हिडीओ, पोस्ट व्हायरल होताना दिसतात, त्याला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो.