Prajakta Gaikwad and Shubhankar Tawde Dance Video: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत प्राजक्ता गायकवाडने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेतून अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. त्यानंतर ती ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतही प्रमुख भूमिकेत दिसली होती. याबरोबरच, ‘चेकमेट: द गेम नेव्हर एंड्स’, ‘लॉकडाऊन लग्न’, ‘स्मार्ट सुनबाई’, ‘सिंगल’, ‘वीर मुरारबाजी’, ‘भिडे वाडा’ अशा अनेक सिनेमांत प्राजक्ताने काम केले आहे.

सध्या प्राजक्ता ‘पाठराखीण’ या मालिकेत काम करत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत दोन बहि‍णींची गोष्ट पाहायला मिळते. यात तिने प्राजक्ता कुलकर्णी ही भूमिका साकारली आहे. ‘पाठराखीण’ या मालिकेत अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. शुंभकर तावडे, गौरी इंगवले, दिप्ती लेले, आशय कुलकर्णी,शंकुतला नरे हे आणि आणखी काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.

प्राजक्ता गायकवाड व शुभंकर तावडेचा जबरदस्त डान्स

मालिकेतील कलाकार त्यांच्या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतातच, पण त्याचबरोबर विविध रील्स, डान्स व्हिडीओ यांमधूनही ते चाहत्यांच्या भेटीला येतात. त्यांच्या व्हिडीओंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते.

आता प्राजक्ता गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर अभिनेता शुंभकर तावडेदेखील दिसत आहे. दोघांनी सुंदर डान्स केला आहे. त्यांनी ‘सत्या’ सिनेमातील ‘सपने में’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या एकापेक्षा एक डान्स स्टेप्स, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, यामुळे त्यांचा डान्स लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने लिहिले की, जेव्हा शूटिंगच्यामध्ये ब्रेक असतो, त्यावेळी आम्ही आनंद निवडतो. प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “सुपर सुपर”, दुसऱ्या एकाने लिहिले, “भारी”, आणखी एकाने लिहिले, “हावभाव खूप सुंदर आहे. कोरिओग्राफी खूप छान आहे”, एकाने लिहिले, “खूप सुंदर डान्स आहे”, आणखी एकाने लिहिले, “कमाल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तसेच, अनेकांनी संपूर्ण टीम छान काम करत आहे असे लिहित मालिकेचेही कौतुक केले. याबरोबरच त्यांचे सहकलाकार गौरी इंगवले, आशय कुलकर्णी यांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे.

दरम्यान, अभिनेत्री सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.