प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक फोटोंबरोरच नवीन प्रोजेक्ट्सबाबतही प्राजक्ता चाहत्यांना माहिती देत असते. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवला. आता प्राजक्ता पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिकेत प्राजक्ताची एन्ट्री होणार आहे, या मालिकेतील एक प्रोमो व्हिडीओ सोनी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आाला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताची झलक पाहायला मिळत आहे. प्राजक्ता पुन्हा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. हेही वाचा>> “खलिस्तानींना पाठिंबा देणाऱ्यांनी लक्षात ठेवा” कंगना रणौतने दिलेल्या ‘त्या’ इशाऱ्यावर प्रसिद्ध गायकाचं उत्तर, म्हणाला “माझं पंजाब…” हेही वाचा>> “त्याने शिवीगाळ केली, गाडीचं पॅनेल तोडलं” एमसी स्टॅनच्या मॅनेजरवर अब्दु रोझिकचे आरोप, म्हणाला “मुस्लीम भाई…” प्राजक्ता तब्बल ६ वर्षांनी मालिकेत पुनरागमन करत आहे. तिला मालिकेत पुन्हा काम करताना पाहून चाहते खूश आहेत. तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. आता प्राजक्ताच्या येण्याने पारगाव पोस्टात काय धमाल होणार आहे, हे पाहणं रंगतदार ठरणार आहे. पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यात आता पोस्टात नवीन एन्ट्री झाल्यामुळे आता काय होणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे. हेही वाचा>> …अन् संजय राऊतांनी केलेलं कंगना रणौतच्या चित्रपटाचं कौतुक, म्हणाले “झाशीच्या राणींवर…” प्राजक्ताने मालिकांबरोबरच मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. 'लकडाऊन बी पॉझिटीव्ह', 'चंद्रमुखी', 'पावनखिंड', 'पांडू' या चित्रपटांत ती झळकली होती. वेब सीरिजमध्येही प्राजक्ताने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.