Pranit More’s Clarification On Abhishek Bajaj Nomination :’बिग बॉस १९’ सुरू होऊन आता ८० दिवस पूर्ण झाले आहेत. हळूहळू हा शो अंतिम टप्प्याकडे जात आहे, त्यामुळे हा शो आता आणखीनच कठीण होत चालला आहे. शोमधील एकेका स्पर्धकाचा या घरातील प्रवास संपत चालला आहे. अशातच मागच्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून अभिषेक बजाज आणि नीलम गिरी बाहेर पडले.
फरहाना भट्ट, गौरव खन्ना, अभिषेक बजाज, नीलम गिरी आणि अशनूर कौर या पाच नॉमिनेटेड स्पर्धकांपैकी गौरव आणि फरहाना यांना सलमान खाननं सेफ म्हणून घोषित केलं. यानंतर उरलेल्या अशनूर, अभिषेक आणि नीलमच्या नॉमिनेशनचा निर्णय सलमाननं प्रणितला दिला.
अशनूर, अभिषेक आणि नीलमपैकी एकाला सेफ करणं हा प्रणितसाठी खूपच कठीण निर्णय होता. कारण या तिघांपैकी अशनूर आणि अभिषेक त्याचे खूपच चांगले मैत्र आहेत. पण, यात प्रणितनं अशनूरचं नाव घेत तिला सेफ केलं, त्यामुळे सहाजिकच नीलम आणि अभिषेक घरातून बाहेर पडले. प्रणितच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्याचा हा निर्णय अनेकांना पटला नाही.
याबद्दल आता प्रणितनं स्वत:चं स्पष्टीकरण दिलं आहे. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये अमालला प्रणितनं अभिषेकच्या नॉमिनेशनच्या निर्णयाबद्दल विचारलं. तेव्हा प्रणितनं त्याची बाजू मांडत सांगितलं, “मी कधीच फक्त गेमचा विचार केला नाही. मी नेहमीच काय योग्य आणि काय अयोग्य याचाच विचार केला आहे. मला तेव्हा जे पर्याय दिले, त्यात अशनूर कौर, नीलम गिरी आणि अभिषेक बजाज ही तीन नावे होती. त्यातून मला एकाला वाचवायचं होतं. त्यापैकी मी अशनूर आणि अभिषेक या दोघांना माझे मित्र मानतो. माझ्या आधीच्या अनुभवावरून मी कायमच अभिषेकला प्राधान्य दिलं.”
यानंतर प्रणितनं सांगितलं, “जेव्हा माझ्याकडे नॉमिनेशनपासून एकाला वाचवण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी हा विचार केला की, मी अशा माणसाची निवड करेन, जो त्याच्या मूल्यांना महत्त्व देईल आणि त्याच्याशी मी सहमत असेल. तसंच जो स्वत:बरोबर इतरांचाही विचार करतो अशा माणसाची मी निवड करू शकेन. अशनूरबाबत जेव्हा बॉडी शेमिंग झालं होतं तेव्हा तिनं ती परिस्थिती खूप योग्य पद्धतीनं हाताळली; त्यामुळे मला असं वाटतं, घरासाठी आणि जी मूल्य मला जाणवतात किंवा माझ्या आई-वडिलांना तेव्हा जी व्यक्ती योग्य वाटली असती त्याचा विचार करून मी अशनूरला नॉमिनेशनपासून वाचवण्याचा निर्णय घेतला.”
दरम्यान, अभिषेकला घराबाहेर काढल्याबद्दल प्रणितवर सोशल मीडियावर टीका झाली. याबद्दल त्याच्या टीमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रणितची बाजू स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता स्वत: प्रणितनंही अभिषेकच्या नॉमिनेशनच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
