Pranit More Ajay Devgn Joke Video : ‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी सध्या चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे प्रणित मोरे. प्रणित हा स्टँडअप कॉमेडियन आहे. त्यानं आपल्या स्टँडअपमधून बॉलीवूडमधील काही कलाकारांवर विनोद केले आहेत. ‘बिग बॉस’चा होस्ट आणि अभिनेता सलमान खानवरही प्रणितनं आधी काही जोक केले होते, ज्याबद्दल सलमाननं पहिल्याच भागात प्रणितचे कान टोचले होते.
यानंतर ‘बिग बॉस’मध्ये आलेल्या प्रत्येक कलाकारानं प्रणितला आपल्यावर काही जोक केला आहे का? हा प्रश्न हमखास विचारला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये अभिनेता अजय देवगण सहभागी झाला होता. ‘दे दे प्यार दे २’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय देवगण रकुल प्रीतसह इतर काही कलाकार ‘बिग बॉस’मध्ये आले होते. यावेळी अजयनंही प्रणितला ‘माझ्यावर काही जोक केला आहेस का?’ असा प्रश्न विचारला होता.
अजयच्या या प्रश्नाला प्रणितने नकार दिला आणि सांगितले की, ‘मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मी आपल्यावर काहीही विनोद केला नाही, मी आपला खूप आदर करतो.’ प्रणितच्या या उत्तरावर सलमान खानदेखील थोडा अवाक झाला होता. मात्र, आता सोशल मीडियावर प्रणितनं अजय देवगणवर जोक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रणितनं काही दिवसांपूर्वी स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केला होता.
अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ या सिनेमातील ‘पहला तू दुजा तू’ या गाण्यातील डान्स स्टेप्स बरीच व्हायरल झाली होती. अजय देवगणच्या डान्स स्टेपवरून त्याला ट्रोल केलं गेलं होतं. अजय देवगणच्या या डान्स स्टेपवरून प्रणितनं आपल्या स्टँडअप शोमध्ये जोक केला होता. याआधीही अजयचं ‘बस तेरे बस तेरे धूमधाम’ हे गाणंही सोप्या डान्स स्टेपमुळे असंच व्हायरल झालं होतं, त्याबद्दलही प्रणितनं जोक केला होता. प्रणितनं स्टँडअप शोमध्ये अजय देवगणच्या डान्सबद्दल खिल्ली उडवलेली व्हिडीओमध्ये दिसत आहे, त्यामुळे मी तुमचा आदर करतो असं अजयला म्हणणाऱ्या प्रणितनं त्याच्यावर जोक केला असल्याचं समोर आलं आहे.
प्रणित मोरेने अजय देवगणवर जोक केलेला व्हिडीओ
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात प्रणित नुकताच परतला आहे. प्रकृतीच्या कारणांमुळे शोमधून त्याची एक्झिट झाली होती, पण आता तो बरा होऊन पुन्हा घरात परतला आहे. त्यानं नुकत्याच झालेल्या नॉमिनेशनच्या भागात अभिषेक बजाजला बाहेर काढलं. अशनूर, नीलम आणि अभिषेक या तिघांपैकी त्यानं अशनूरला वाचवलं आणि अभिषेकला बाहेर काढलं, त्यामुळे त्याच्यावर टीकाही होत आहे.
