scorecardresearch

Video : पाठ दाबली, अंगावर बसली अन्…; प्रार्थना बेहरेचा नवऱ्याबरोबरचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, सहकलाकार म्हणाली, “दाखवायचे दात…”

प्रार्थना बेहरेचा नवऱ्यासह बेडरुम व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना प्रार्थनाचं उत्तर

Video : पाठ दाबली, अंगावर बसली अन्…; प्रार्थना बेहरेचा नवऱ्याबरोबरचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, सहकलाकार म्हणाली, “दाखवायचे दात…”
प्रार्थना बेहरेचा नवऱ्यासह बेडरुम व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना प्रार्थनाचं उत्तर

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. मराठी मालिका असो वा चित्रपट प्रार्थना तिच्या प्रत्येक भूमिकांमधून प्रेक्षकांना आपलंस करून घेते. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील प्रार्थनाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. इतकंच नव्हे तर प्रार्थना आपल्या कामामधून वेळ काढत सोशल मीडियाद्वारे विविध पोस्ट शेअर करत असते. आताही तिने नवऱ्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रार्थनाचा पती अभिषेक जावकरचा वाढदिवस होता. याचनिमित्त नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये प्रार्थनाचा मजेशीर अंदाज पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – ‘वेड’ची कमाई पाहून भारावली रितेश देशमुखची वहिनी, म्हणाली, “४१ कोटी रुपयांचा…”

प्रार्थना बेहरेचा बेडरुम व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये प्रार्थना अभिषेकची पाठ दाबताना दिसते. त्यानंतर ती त्याच्या अंगावर बसते आणि मसाज करू लागते. “याच्या वाढदिवशी काय काय करावं लागतं?” असं प्रार्थना या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओ तिची सहअभिनेत्री काजल काटेने कमेंट केली आहे. तर इतर चाहत्यांच्या कमेंटलाही प्रार्थनाने उत्तर दिलं आहे.

“हे फक्त दाखवायचे दात आहेत. बिचारा अभि तुझ्याच सेवेमध्ये कायम असतो.” असं अभिनेत्री काजलने म्हटलं आहे. तर प्रार्थना ज्याची पाठ दाबत आहे तो नशीबवान आहे, नवऱ्याने कोणत्या तुळशीला पाणी घातलं होतं, प्रार्थना तू नशिबवान आहेस तुला असा नवरा भेटला अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी बेडरुम व्हिडीओ शेअर करण्याची गरज होती का? असंही म्हटलं आहे. तर प्रार्थनाने व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना विविध इमोजीच्या स्वरुपात उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या