Video: श्रेयस तळपदेच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेने उलगडली त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री, व्हिडीओ पाहून अभिनेता म्हणाला... | Prarthana behere shared fun video of her and shreyas talpade on his birthday | Loksatta

Video: श्रेयस तळपदेच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेने उलगडली त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री, व्हिडीओ पाहून अभिनेता म्हणाला…

प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

shreyas prarthana

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यात प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांनी साकारलेल्या यश आणि नेहा या पात्रांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेदरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. आज श्रेयसच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थनाने हीच मैत्री चाहत्यांसमोर आणली आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना आणि श्रेयस पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले. एकत्र काम करताना त्यांच्या ऑनस्क्रीन बॉण्डिंग बरोबरच त्यांच्यातलं ऑफ स्क्रीन बॉण्डिंगही घट्ट होत गेलं. ते सेटवर काय काय मजा मस्ती करतात याचे अपडेट्स प्रार्थना विविध पोस्ट शेअर करत देत असायची. आता श्रेयस च्या वाढदिवसानिमित्त तिने एक त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून पुन्हा एकदा त्यांच्यात असलेली मैत्री प्रेक्षकांसमोर आली आहे.

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

प्रार्थनाने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतच्या वेळेचा तिचा आणि श्रेयसचा एक बिहाइंड द सीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अनेक छोट्या छोट्या व्हिडीओ क्लिप्स आणि काही फोटो आहेत, जे एकत्र करून हा एक व्हिडीओ बनवण्यात आला आहे. यात श्रेयस आणि प्रार्थना शूटिंग दरम्यानच्या मधल्या वेळेत मजा मस्ती करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे मालिकेतील ही त्यांचे काही सीन्स तिने या व्हिडिओत शेअर केले आहेत. मालिकेसाठी त्यांनी केलेलं फोटोशूट, त्यांना मिळालेले पुरस्कार हे क्षण देखील तिने या व्हिडीओमध्ये उलगडले आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने लिहिलं, “हॅपी बर्थडे श्रे…यश…सर!”

हेही वाचा : Video: परीच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेची खास पोस्ट, म्हणाली, “मला तू…”

आता प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ श्रेयसला देखील आवडला असून त्यानेही कमेंट करत या खास पोस्टला रिप्लाय दिला. त्याने कमेंट करत लिहिलं, “थँक यू मॅडम.” तर ही मालिका जरी आता संपली असली तरीही जोडी लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्या मालिकेच्या शेवटच्या भागाच्या दिवशी या दोघांनी एक पोस्ट शेअर करत ते दोघे एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत अशी हिंट चाहत्यांना दिली. त्यामुळे आता या दोघांमधील केमिस्ट्री आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 12:33 IST
Next Story
नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”