scorecardresearch

प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

हे दोघं गेले अनेक महिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या परीक्षकांची भूमिका बजावत आहेत.

prasad sai

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात नुकतीच विवाह बंधनात अडकली. २ फेब्रुवारी रोजी तिने बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्न केलं. त्यांचं लग्न अत्यंत धूम धडाक्यात पार पडलं. लग्नानंतर दोन दिवसातच ती पुन्हा एकदा शूटिंगला परतली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरील तिचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. पण आता अशातच या कार्यक्रमात परीक्षकांच्या खुर्चीत बसणारे प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांना माफी मागावी लागली आहे.

वनिताच्या लग्नाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक कलाकार देखील या लग्नाला उपस्थित होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली. फक्त लग्नच नाही तर त्यांनी हळदी आणि संगीत समारंभातदेखील सहभाग घेतला होता. पण यावेळी प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर कुठेही दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे विविध चर्चा रंगत होत्या. आता अखेर प्रसाद आणि सई यांनी वनिताची हात जोडून माफी मागितली आहे.

आणखी वाचा : “महाराष्ट्राची हास्यजत्रेत त्याचं टॅलेंट…” ओंकार भोजनेबद्दल वनिता खरातची प्रतिक्रिया चर्चेत

प्रसाद ओकने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला. यात त्याच्याबरोबर सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके आणि सई ताम्हणकर दिसत आहेत. यात हे तिघही सर्वांची हात जोडून माफी मागत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “वनिताच्या लग्नाला उपस्थित राहता न आल्यामुळे मी, सई ताम्हणकर आणि अमित फाळके जाहीर माफी मागत आहोत.” आता प्रसादची ही स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे. तर ही गमतीशीर स्टोरी रिपोस्ट करत वनिताने देखील त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. ही स्टोरी रिपोस्ट करत तिने लिहिलं, “गिफ्ट दिल्याशिवाय माफी मिळणार नाही.”

हेही वाचा : सुबोध भावेनंतर ‘हा’ आघाडीचा अभिनेता साकारणार बालगंधर्व यांची भूमिका, फोटो व्हायरल

दरम्यान मोजक्याच मंडळींच्या उपस्थित वनिताचा पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला. ठाण्यातील येऊर हिल्स येथील ‘Exotica’ रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:25 IST