Premium

“नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…”

“नातेवाईकांकडून मला…” प्रसाद ओकने केलेलं वक्तव्य चर्चेत

prasad oak on relatives
प्रसाद ओकने नातेवाईकांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मनोरंजन विश्वात अभिनय व कौशल्याच्या जोरावर त्याने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्रसादने नाटकापासून अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. करिअरसाठी अभिनयाचं क्षेत्र निवडल्यामुळे त्याला नातेवाईकांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसादने नुकतीच ‘इसापनीती’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत भाष्य केलं. या संपूर्ण काळात प्रसादची पत्नी मंजिरी त्याच्यामागे ठामपणे उभी होती. या कठीण काळात पत्नीची कशी साथ लाभली, याबाबतही प्रसादने सांगितलं. प्रसाद म्हणाला, “माझ्या यशात मंजिरीचा १०० टक्के वाटा आहे. १९९६ साली तिने मला पुणे सोडून मुंबईला जाण्यास सांगितलं. तिच्यामुळेच आज मी इथे आहे. मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी १९९८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरही एक वर्ष मी एकटाच मुंबईत होतो. त्यानंतर १९९९ मध्ये मंजिरी मुंबईला आली. त्यानंतर आमचा संसार सुरू झाला”.

हेही वाचा>> “…त्यानंतर मी चार दिवस जेवलो नाही”, ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशानंतर प्रसाद ओकची अशी झालेली अवस्था, म्हणाला “लोकांना…”

हेही वाचा>>“…तर कार्यक्रमात धुडगूस घालू” एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मनसेचा विरोध, नेमकं प्रकरण काय?

“या संपूर्ण काळात घर, मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण आणि नातेवाईक हे सगळं तिने सांभाळलं. नातेवाईक हा अत्यंत किचकट आणि अत्यंत वैताग येणारा प्रकार आहे. सुरुवातीच्या काळात नातेवाईकांकडून अभिनय हे काय क्षेत्र आहे? यात काय करिअर होणार आहे का? यापेक्षा चांगली बँकेत नोकरी बघितली असतीस…असं मला ऐकवलं जायचं. आज २२-२५ वर्षांनंतर तेच नातेवाईक त्यांच्या मुलांना माझ्याबरोबर फोटो काढायला पाठवतात. हेही मला आवडत नाही”, असं प्रसादने सांगितलं.

हेही वाचा>>‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नाच्या सात वर्षांनंतर होणार आई

पुढे तो म्हणाला, “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो. त्यांच्याकडून कधीच काही चांगलं मला मिळालं नाही. मला जे काही दिलं ते माझ्या बायकोने दिलं. माझ्या शिक्षकांनी माझ्यावर संस्कार केले. आईने मला गाणं दिलं. पण नातेवाईकांनी मला काहीच दिलं नाही”. “पण मंजिरीने या सगळ्या नातेवाईकांना सांभाळलं आहे. नातेवाईकांसमोर माझी बाजू ती सावरत राहिली. सगळा भार तिने एकटीने पेलला आहे”, असंही पुढे प्रसाद म्हणाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prasad oak talk about relatives and wife manjiri oak contribution in his career kak

First published on: 18-03-2023 at 15:26 IST
Next Story
कोट्यवधींची प्रॉपर्टी असणाऱ्या कपिल शर्माची पहिली कमाई ठाऊक आहे का? ‘या’ ठिकाणी करत होता काम