‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. सामान्य जनतेप्रमाणे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारमंडळी या कार्यक्रमाचं कौतुक करत असतात. या कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी परीक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत हास्यजत्रेतील विनोदवीरांचं कौतुक केलं. सर्वांना खळखळून हसवणाऱ्या विनोदवीरांना मंजिरी ओक नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

हेही वाचा : Video : “तू गेल्यावर सगळं घर…”, चिमुकल्या मायराने गणपती बाप्पाला घातलं गोड गाऱ्हाणं, पाहा व्हिडीओ

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

प्रसादची ओकची बायको मंजिरीने हास्यत्रेतील एका स्किटचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम शेअर करत विनोदवीरांचं कौतुक केलं आहे. या फोटोमध्ये अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री वनिता खरात यांची झलक पाहायला मिळत आहे. स्किटमधील पात्रांनुसार पृथ्वीक आणि वनिताने वयस्कर लोकांचा गेटअप केल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

हेही वाचा : Video: “तुझ्याऐवजी माझं लग्न राक्षसाबरोबर झालं असतं तर बरं झालं असतं”, ‘ठरलं तर मग’मधील सायली-अर्जुनमध्ये नेमकं काय घडलं? पाहा

मंजिरीने पृथ्वीक आणि वनिताचा फोटो शेअर करत त्यावर, “अरे कोण असता तुम्ही? काय करायचं तुमचं? ठार वेडे आहात…वनिता” असं कॅप्शन देत दोघांचंही कौतुक केलं आहे. अभिनेत्री वनिता खरातने हा फोटो रिशेअर करून मंजिरीचे आभार मानत “धन्यवाद ताई” असं म्हटलं आहे.

हेही वाचा : Video: अधिकारी समीर वानखेडे अन् अभिनेत्री क्रांती रेडकरने घेतले लालबागचा राजाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

manjii oak
मंजिरी ओकची खास पोस्ट

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’-सहकुटुंब हसूया! या नव्या पर्वाची सुरुवात १४ ऑगस्टपासून झाली होती. उत्तम अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Story img Loader