Premium

“ठार वेडे आहात…”, हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून प्रसाद ओकची बायको भारावली, पोस्ट शेअर करत केलं कौतुक

“अरे कोण असता तुम्ही?”, हास्यजत्रेच्या कलाकारांसाठी प्रसाद ओकच्या बायकोची खास पोस्ट…

prasad oak wife manjiri oak shares special post for maharashtrachi hasya jatra
प्रसाद ओकची बायको मंजिरीची हास्यजत्रेच्या कलाकारांसाठी खास पोस्ट ( फोटो : इन्स्टाग्राम )

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. सामान्य जनतेप्रमाणे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारमंडळी या कार्यक्रमाचं कौतुक करत असतात. या कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी परीक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत हास्यजत्रेतील विनोदवीरांचं कौतुक केलं. सर्वांना खळखळून हसवणाऱ्या विनोदवीरांना मंजिरी ओक नेमकं काय म्हणाली जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : “तू गेल्यावर सगळं घर…”, चिमुकल्या मायराने गणपती बाप्पाला घातलं गोड गाऱ्हाणं, पाहा व्हिडीओ

प्रसादची ओकची बायको मंजिरीने हास्यत्रेतील एका स्किटचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम शेअर करत विनोदवीरांचं कौतुक केलं आहे. या फोटोमध्ये अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री वनिता खरात यांची झलक पाहायला मिळत आहे. स्किटमधील पात्रांनुसार पृथ्वीक आणि वनिताने वयस्कर लोकांचा गेटअप केल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

हेही वाचा : Video: “तुझ्याऐवजी माझं लग्न राक्षसाबरोबर झालं असतं तर बरं झालं असतं”, ‘ठरलं तर मग’मधील सायली-अर्जुनमध्ये नेमकं काय घडलं? पाहा

मंजिरीने पृथ्वीक आणि वनिताचा फोटो शेअर करत त्यावर, “अरे कोण असता तुम्ही? काय करायचं तुमचं? ठार वेडे आहात…वनिता” असं कॅप्शन देत दोघांचंही कौतुक केलं आहे. अभिनेत्री वनिता खरातने हा फोटो रिशेअर करून मंजिरीचे आभार मानत “धन्यवाद ताई” असं म्हटलं आहे.

हेही वाचा : Video: अधिकारी समीर वानखेडे अन् अभिनेत्री क्रांती रेडकरने घेतले लालबागचा राजाचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल

मंजिरी ओकची खास पोस्ट

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’-सहकुटुंब हसूया! या नव्या पर्वाची सुरुवात १४ ऑगस्टपासून झाली होती. उत्तम अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prasad oak wife manjiri oak shares special post for maharashtrachi hasya jatra fame vanita kharat and prithvik pratap sva 00

First published on: 27-09-2023 at 12:53 IST
Next Story
Video : “तू गेल्यावर सगळं घर…”, चिमुकल्या मायराने गणपती बाप्पाला घातलं गोड गाऱ्हाणं, पाहा व्हिडीओ