‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाचं पहिलं पर्व खूपच गाजलं होतं. या पहिल्या पर्वातील कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत या पंचरत्नांवर आजही प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. हे पंचरत्न सध्या त्यांच्या व्यावसायिक आयुष्याविषयी जितकेच चर्चेत असतात तितकंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोललं जातं. आज या पंचरत्नांपैकी एका रत्नाचा म्हणजेच मुग्धा वैशंपायनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पती, लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटेने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी मुग्धा वैशंपायन आज २४व्या वर्षात पदार्पण करत आहे. वयाच्या २३व्या वर्षी मुग्धाने प्रथमेश लघाटेशी लग्न केलं. दोघांचा लग्नसोहळा पारंपरिक व मोठ्या थाटामाटात पार पडला होता. ग्रहमख, हळद, सप्तपदी, असा समारंभपूर्व लग्नसोहळा मुग्धा-प्रथमेशचा पाहायला मिळाला. आज मुग्धाच्या वाढदिवसानिमित्ताने प्रथमेश इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.

Crime News Delhi
IRS ऑफिसरची ‘हेट स्टोरी’, फ्लॅटमध्ये आढळला प्रेयसीचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक; नेमकं काय घडलं?
Marathi actress Anagha Atul brother Akhilesh Bhagare Will get Marriage
Video: भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाआधीच्या कार्यक्रमांना पारंपरिक पद्धतीत झाली सुरुवात, पाहा व्हिडीओ
Sachin Tendulkar Emotional Post on Late Father 25 th Death Anniversary
“मी तेव्हा २६ वर्षांचा होतो, आज ५१ व्या वर्षी…”, वडिलांच्या आठवणीत सचिन तेंडुलकर व्याकूळ, जुन्या खुर्चीजवळ उभा राहून म्हणाला…
daljeet kaur second husband affair
पतीचे विवाहबाह्य संबंध? वर्षभरापूर्वी दुसरं लग्न करणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “मुलांसाठी गप्प…”
madhuri dixit and kartik aryan dances on dholna song
Video : २७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर माधुरी दीक्षित अन् कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
Mohini ekadashi
Mohini Ekadashi : १२ वर्षानंतर मोहिनी एकादशीच्या दिवशी अद्भुत संयोग, ‘या’ राशी होतील मालामाल; मिळणार बंपर पैसा
nobel winning canadian author alice munro
बुकमार्क : मन्रो-कथांच्या अ‍ॅलिसनगरीत..
Amit Shah on Arvind Kejriwal
‘७५ वर्षांचे झाल्यानंतर नरेंद्र मोदी निवृत्त होणार?’ केजरीवालांच्या दाव्यावर अमित शाहांचे प्रत्युत्तर

हेही वाचा – विजय चव्हाणांचे ‘असे’ होते शेवटचे दिवस, हॉस्पिटलमध्ये बेडवर असताना लेकाचं लग्न पाहण्याची केली इच्छा अन्…

प्रथमेशने इन्स्टाग्राम स्टोरीवर दोघांचा फोटो शेअर करून लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय फॉरेव्हर.” प्रथमेशने या खास अंदाजात दिलेल्या शुभेच्छा पाहून मुग्धाने त्याचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – …म्हणून विजय चव्हाणांच्या पत्नीने सोडलं अभिनय क्षेत्र, विभावरी चव्हाण म्हणाल्या….

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा व प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं.

प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं. घरच्यांना सांगितल्यानंतर दोघांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी २१ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकले.