scorecardresearch

“१०० टक्के हत्या…”; तुनिषा शर्मा प्रकरणावर प्रत्युषा बॅनर्जीच्या वडिलांनी केला गंभीर आरोप

मागच्या काही वर्षांपासून होणाऱ्या मृत्यूंना आत्महत्येचे कारण दिल जात आहे

“१०० टक्के हत्या…”; तुनिषा शर्मा प्रकरणावर प्रत्युषा बॅनर्जीच्या वडिलांनी केला गंभीर आरोप
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

२४ डिसेंबरला टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने गळफास लावून घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या पार्थिवावर दोन दिवसांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले होते. लाल रंगाच्या कपड्यांमध्ये तिला गुंडाळण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या आत्महत्येचं गूढ वाढतं आहे. अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या वडिलांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणाचा प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूशी जोडला जात आहे. प्रत्युषाच्या वडिलांनी आजतकशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असं म्हणाले की “तुनिषाची बातमी ऐकल्यावर मला वाईट वाटले. अचानक जुन्या जखमा आठवल्या, एक वडील या नात्याने मी तुनिषाच्या आईच्या भावना समजू शकतो. खरं सांगू का तुनिषाच्या मृत्यू नसून तो खून आहे असं वाटत मला, मागच्या काही वर्षांपासून होणाऱ्या मृत्यूंना आत्महत्येचे कारण दिल जात आहे. सुशांत सिंह प्रकरणातदेखील हाच प्रकार घडला आहे.”

Video: पोलिसांनी अनवाणी शिझान खानला खेचलं अन्… कोर्टात नेतानाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

शंकर पुढे सांगतात, “हे कसे शक्य आहे की तुम्ही अशा वातावरणात आहात, जिथे एवढी माणसे तुमच्या अवतीभवती आहेत, तिथे कोणी असे पाऊल कसे उचलू शकते. जर एखाद्याने हेतुपुरस्सर आत्महत्या केली असेल तर तो खात्री करतो की त्याने एक चिठ्ठी किंवा पत्र मागे सोडले आहे जेणेकरून इतर लोकांना त्रास होणार नाही. ही १००% हत्येचं प्रकरण आहे. मी प्रत्युषाचे वडील या नात्याने सांगू शकतो तुनिषाची आत्महत्या नसून तो एक खून आहे.”

“शिझान खानला फाशी द्या”, तुनिषा शर्माच्या आईला भेटल्यानंतर रामदास आठवलेंची मागणी

नेमकं काय घडलं

२४ डिसेंबरला तुनिशा शर्मा सकाळी अत्यंत आनंदात सेटवर गेली होती. शिझान आणि तुनिषा या दोघांनी दुपारी ३ वाजता सोबत जेवणही केलं. त्यानंतर सव्वा तीन वाजता तुनिषा शर्माचा मृतदेह गळफास लागलेल्या अवस्थेत सापडला. ३ वाजेपर्यंत जी मुलगी नॉर्मल होती तिने सव्वा तीन वाजता इतकं टोकाचं पाऊल कसं काय उचललं? त्यामागे काय कारण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 18:50 IST

संबंधित बातम्या