Premachi Goshta Serial : तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत सावनी व हर्षवर्धन यांच्या लग्नाची जोरदार तयारी चालू असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, ऐनवेळी हर्षवर्धन मुक्ता – सागरच्या विरोधात मोठा डाव खेळून मिहिकाला आपल्या जाळ्यात ओढतो असं पाहायला मिळालं.

हर्षवर्धनने मिहिकाचा गैरफायदा घेतल्याचं मुक्ता सावनीला सांगते तरीही, प्रेमात आंधळी झालेली सावनी हर्षवर्धनशी लग्न करायला तयार असते. मुक्ता सत्य सांगून दोघांचं लग्न मोडते. त्यामुळे भडकलेली सावनी कोळी कुटुंबीयांच्या घरी महिला संघटनेचा मोर्चा पाठवते. यावेळी मुक्ताची सासू इंद्रा आपल्या सुनेची खंबीरपणे बाजू घेते. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मुक्ताच्या घरातून मिहिका नाहिशी होते.

premachi goshta fame apurva nemlekar bought new car
Video : ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सावनीच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली नवीकोरी गाडी; अपूर्वाने कुटुंबासह केली पूजा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Hungama 2 actress Pranitha Subhash blessed with baby boy
बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न
Deepika Padukone Admitted in Hospital for Delivery
दीपिका पादुकोण गणेश चतुर्थीच्या दिवशी देणार बाळाला जन्म, डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल, पाहा Video
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
Kolkata Rape and Murder Accused Sujoy Roy
Sanjoy Roy : “संजय रॉय आधी रेड लाईट एरियात गेला आणि…”, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीबाबत माहिती समोर
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!

हेही वाचा : Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’ होस्ट करण्यासाठी होकार दिल्यावर ‘अशी’ होती पत्नी जिनिलीयाची प्रतिक्रिया

मिहिकाला शोधण्यासाठी मुक्ता आकाश पाताळ एक करते. तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करते…परंतु, मिहिकाबद्दल कोणाला काहीच माहिती नसते. “मी लवकरच परत येईन” असा मेसेज देऊन मिहिका घरातून निघून गेलेली असते. “बहीण सापडत नाहीये म्हणून मुक्ताने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही” असं इंद्रा सागरला सांगते. सर्वत्र मिहिकाची शोधाशोध सुरु असते. इतक्यात हर्षवर्धन पत्रकार परिषद घेत लग्न केल्याचं जाहीर घेतो. तो सर्वांना त्याच्या बायकोची ओळख करून देतो.

हर्षवर्धनची पत्नी दुसरी-तिसरी कोणीही नसून मिहिका असते. हर्षवर्धन सावनीला घराबाहेर हाकलून लावतो अन् मिहिकासह गृहप्रवेश करतो. तसेच मिहिका देखील बहिणीला मी हे लग्न माझ्या सहमतीने केल्याचं सांगते.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : यंदाची थीम, ‘बिग बॉस’ करन्सी ते Dilemma! स्पर्धकांसाठी कोणते ट्विस्ट येणार? जाणून घ्या…

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवीन प्रोमो ( Premachi Goshta )

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मिहिकाचं पात्र अभिनेत्री मृणाली शिर्के साकारत होती. परंतु, हर्षवर्धन व मिहिका लग्न करून आल्यावर आता मुक्ताच्या बहिणीच्या रुपात अभिनेत्री अमृता बने मालिकेत झळकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Premachi Goshta
Premachi Goshta ( फोटो सौजन्य : marathiserials_official )

मृणालीने ‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) मालिकेतून एक्झिट घेतली असून आता तिच्याजागी अभिनेत्री अमृता बने मिहिका हे पात्र साकारणार आहे. मालिकेचा हा नवा प्रोमो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.