Premachi Goshta Serial : तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत सावनी व हर्षवर्धन यांच्या लग्नाची जोरदार तयारी चालू असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, ऐनवेळी हर्षवर्धन मुक्ता - सागरच्या विरोधात मोठा डाव खेळून मिहिकाला आपल्या जाळ्यात ओढतो असं पाहायला मिळालं. हर्षवर्धनने मिहिकाचा गैरफायदा घेतल्याचं मुक्ता सावनीला सांगते तरीही, प्रेमात आंधळी झालेली सावनी हर्षवर्धनशी लग्न करायला तयार असते. मुक्ता सत्य सांगून दोघांचं लग्न मोडते. त्यामुळे भडकलेली सावनी कोळी कुटुंबीयांच्या घरी महिला संघटनेचा मोर्चा पाठवते. यावेळी मुक्ताची सासू इंद्रा आपल्या सुनेची खंबीरपणे बाजू घेते. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मुक्ताच्या घरातून मिहिका नाहिशी होते. हेही वाचा : Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’ होस्ट करण्यासाठी होकार दिल्यावर ‘अशी’ होती पत्नी जिनिलीयाची प्रतिक्रिया मिहिकाला शोधण्यासाठी मुक्ता आकाश पाताळ एक करते. तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करते…परंतु, मिहिकाबद्दल कोणाला काहीच माहिती नसते. "मी लवकरच परत येईन" असा मेसेज देऊन मिहिका घरातून निघून गेलेली असते. "बहीण सापडत नाहीये म्हणून मुक्ताने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही" असं इंद्रा सागरला सांगते. सर्वत्र मिहिकाची शोधाशोध सुरु असते. इतक्यात हर्षवर्धन पत्रकार परिषद घेत लग्न केल्याचं जाहीर घेतो. तो सर्वांना त्याच्या बायकोची ओळख करून देतो. हर्षवर्धनची पत्नी दुसरी-तिसरी कोणीही नसून मिहिका असते. हर्षवर्धन सावनीला घराबाहेर हाकलून लावतो अन् मिहिकासह गृहप्रवेश करतो. तसेच मिहिका देखील बहिणीला मी हे लग्न माझ्या सहमतीने केल्याचं सांगते. हेही वाचा : Bigg Boss Marathi : यंदाची थीम, ‘बिग बॉस’ करन्सी ते Dilemma! स्पर्धकांसाठी कोणते ट्विस्ट येणार? जाणून घ्या… 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा नवीन प्रोमो ( Premachi Goshta ) 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मिहिकाचं पात्र अभिनेत्री मृणाली शिर्के साकारत होती. परंतु, हर्षवर्धन व मिहिका लग्न करून आल्यावर आता मुक्ताच्या बहिणीच्या रुपात अभिनेत्री अमृता बने मालिकेत झळकत असल्याचं पाहायला मिळत आहे. Premachi Goshta ( फोटो सौजन्य : marathiserials_official ) मृणालीने 'प्रेमाची गोष्ट' ( Premachi Goshta ) मालिकेतून एक्झिट घेतली असून आता तिच्याजागी अभिनेत्री अमृता बने मिहिका हे पात्र साकारणार आहे. मालिकेचा हा नवा प्रोमो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.