Premium

प्रेमाची गोष्ट: ‘या’ अटीवर मुक्ता सागरबरोबर लग्न करायला झाली तयार, मालिकेचा नवा प्रोमो आला समोर

Premachi Goshta: सागर मुक्ताची ‘ही’ अट मान्य करतो का? जाणून घ्या…

premachi goshta new promo Mukta agreed to marry Sagar on one condition
Premachi Goshta: सागर मुक्ताची 'ही' अट मान्य करतो का? जाणून घ्या…

तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेजश्रीने साकारलेली मुक्ता आणि राजने साकारलेला सागर अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सध्या मुक्ता आणि सागर लग्नासाठी तयार होणार की नाही? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहील आहे. अशातच मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये मुक्ता एका अटीवर सागरबरोबर लग्न करायला तयार झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात मुक्ताचे वडील आणि सागरच्या वडिलांनी ठरवलेल्या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला कोळी आणि गोखले कुटुंब एकमेकांसमोर येतात. यामुळे दोन्ही कुटुंबांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यावेळेस मुक्ताचे वडील आणि सागरचे वडील स्पष्ट सांगतात की, मुक्ता आणि सागरचं लग्न करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण हा निर्णय दोन्ही कुटुंबांना मान्य नसतो. कारण सतत दोन्ही कुटुंबामधील होणारे वाद, गैरसमज यामुळे कोळी आणि गोखले कुटुंबातील सदस्य मुक्ता आणि सागरच्या लग्नाला नकार देतात. शिवाय मुक्ता आणि सागर देखील लग्नाला नकार देऊन दोघांच तोंड सुद्धा बघायचं नाही म्हणतात. हे पाहून मुक्ताचे वडील आणि सागरच्या वडिलांना काहीच सुचतं नाही. पण दोघं मुक्ता आणि सागरचं लग्न करायचं या निर्णयावर ठाम असतात. अशातच मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये मुक्ता सागरबरोबर लग्न करायला तयार झालेली पाहायला मिळत आहे. पण ते एका अटीवर…

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी; व्हिडीओ पाहून प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली, “शाहरुख खान सारखं…”

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा हा नवा प्रोमो तेजश्री प्रधानच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मुक्ता म्हणतेय, “मुद्दा असा आहे की, मी या लग्नाला होकार दिलाय. पण माझी एक अट आहे. मिहीरने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मी हे लग्न करेन.” यावर सागर म्हणतो, “मी तुम्हाला शेवटचं सांगेन, एक नातं जोडण्यासाठी दुसरं नातं मी तोडत नाही. मी कधीच त्याला जेलमध्ये जाऊ देणार नाही.”

हेही वाचा – “माझ्या लग्नाला सासरकडून होता विरोध”, कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “मला कायम…”

दरम्यान, आता जरी सागरने मुक्ताची अट मान्य केली नसली तरी मालिकेत पुढे नक्की काय घडतंय? मुक्ता आणि सागर लग्नासाठी कसे होकार देतायत? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Premachi goshta new promo mukta agreed to marry sagar on one condition pps

First published on: 02-12-2023 at 14:37 IST
Next Story
राणादा-पाठकबाईंच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अक्षया देवधर पोस्ट करत म्हणाली, “माझा नवरा…”