‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं, आज प्रेक्षक आवडीने हा कार्यक्रम पाहतात. या कार्यक्रमातून बरेच नवे चेहरे लोकांना माहीत झाले, इतकंच नव्हे, ते घराघरांत पोहोचले. त्यापैकीच एक चेहरा म्हणजे पृथ्वीक प्रताप. पृथ्वीक प्रतापने आतापर्यंत अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय, पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली.

नुकतंच पृथ्वीकने ‘संपूर्ण स्वराज’ या यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली अन् त्याच्या या प्रवासाबद्दल बरेच खुलासे केले. या मुलाखतीमध्ये पृथ्वीकने त्याच्यावर शाहरुख खानचा किती प्रभाव आहे यावर भाष्य केलं. लहानपणापासूनच पृथ्वीकला शाहरुख खान बनायचं होतं, नंतर जेव्हा तो या क्षेत्रात आला तेव्हा त्याला हे जाणवलं की शाहरुख खान बनण्याआधी एक अभिनेता बनणं फार महत्त्वाचं आहे.

Father Arrested for sexual Abusing 10 Year Old Daughter
वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा, काय घडले?
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Solapur crime news
लातूरच्या अल्पवयीन मुलीस जन्मदात्या आईनेच विकून लग्न लावले, माढ्यातील धक्कादायक प्रकार
Girl suicide Sangli, Girl harassment,
सांगली : सततच्या छेडछाडीमुळे तरुणीची आत्महत्या
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…

आणखी वाचा : आडनाव का लावत नाहीस? ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितली दोन कारणं; म्हणाला, “आडनाव पाहून…”

या एकंदर प्रवासाबद्दल आणि शाहरुख खानबद्दल पृथ्वीक म्हणाला, “मला शाहरुखचा चार्म आणि करिश्मा प्रचंड आवडतो. तो फक्त स्क्रीनवर त्याचे दोन हात बाहेर काढून नुसता उभा राहतो आणि आपण त्याच्या प्रेमात पडतो. हे मला लहानपणी आवडायचं, पण जसजसा मी मोठा होत गेलो तेव्हा त्याच्या स्ट्रगलबद्दल जाणून घेतलं आणि तेव्हा जाणीव झाली की या माणसाने नेमकी काय मेहनत घेतली आहे.”

पुढे पृथ्वीक म्हणाला, “आपल्या आई-वडिलांना गमावून एका अनोळखी राज्यात आणि शहरात येणं, हळूहळू त्या शहरावर आणि मग जगावर राज्य करणं. ही अशक्य गोष्ट शाहरुखने शक्य करून दाखवली, याचसाठी मला तो आवडतो.” याच मुलाखतीमध्ये पृथ्वीकने अशा बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं आहे.