छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार नेहमी चर्चेत असतात. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात या कलाकारांनी वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षांपासून हास्यजत्रेचे कलाकार अधिराज्य गाजवत आहे. यापैकी एक म्हणजे पृथ्वीक प्रताप ( Prithvik Pratap ). मराठीसह हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा पृथ्वीक आता विविधांगी भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या पृथ्वीकची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. अभिनेत्याने ही पोस्ट प्राजक्ता माळीसाठी खास शेअर केली होती. पृथ्वीकच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता पृथ्वीक प्रतापने ( Prithvik Pratap ) प्राजक्ता माळीसाठी ही खास पोस्ट तिच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली होती. प्राजक्ता माळीचा ८ ऑगस्टला वाढदिवस होता. यानिमित्ताने पृथ्वीकने प्राजक्ताबरोबरच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. "वाढदिवसाच्या शुभेच्छा फुलवंती. बाकी तुला तर सगळं माहितीच आहे," असं कॅप्शन पृथ्वीकने पोस्टला लिहिलं आहे. तसंच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, पृथ्वीक व प्राजक्ताचे सुंदर, मस्ती करतानाचे फोटो पाहायला मिळत आहेत. पृथ्वीक व प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. हेही वाचा - Video: ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळताना पाहून मराठी अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणाली, “आमचं वैभव…” काही नेटकऱ्यांनी प्राजक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण काही नेटकऱ्यांनी पृथ्वीक ( Prithvik Pratap ) व प्राजक्ताच्या जोडीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, "जमला जोडा उरकून टाका." तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "तुला तर लॉटरी लागली…एन्जॉय." तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "जोडी चांगली आहे." चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, "जोडी एकदम खतरनाक आहे." अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. याआधी पृथ्वीक ( Prithvik Pratap ) व प्राजक्ता माळीचा ऑस्ट्रेलियातील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता पृथ्वीकचा हात पकडून दोघं एकत्र चालताना दिसत होते. या व्हिडीओच्या मागे शाहरुख खानचं ‘मैं कोई ऐसा गीत गाऊं हे’ गाणं लावलं होतं. हेही वाचा – Video: “डोळ्यात पाणी आणलंत…”, ड्रामा ज्युनिअर्सने ‘धर्मवीर’ चित्रपटातील केलेला ‘तो’ सीन पाहून प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ https://www.instagram.com/reel/C4kPuN_Idx4/?utm_source=ig_embed&ig_rid=f2df766c-ffce-4df7-a2ab-c41ae59635f9 प्राजक्ता माळीचा नवा चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित दरम्यान, प्राजक्ता माळीने काल वाढदिवसानिमित्ताने 'फुलवंती' चित्रपटासंदर्भात मोठी घोषणा केली. 'फुलवंती' चित्रपटातील तिचा नऊवारी साडी, भरजरी दागिने, नाकात नथ असा मराठमोळा लूकचा व्हिडीओ शेअर करत तिने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्राजक्ताचा 'फुलवंती' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटासाठी प्राजक्ता निर्माती म्हणूनही काम करत आहे.