मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. बरेच चित्रपट, मालिका, नाटकं आणि वेब सीरिजमध्ये काम करून आपल्या अभिनयचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रिया बापटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच प्रिया बापटने सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. ज्यात प्रियाने एका प्रश्नाचं उत्तर देताना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा धक्कादायक अनुभव शेअर केला.

सुबोध भावे सुत्रसंचलन करत असलेला ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या बराच गाजतोय. आतापर्यंत सुप्रिया सुळेपासून सोनाली कुलकर्णीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. सध्या प्रिया बापट स्पेशल एपिसोड सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. या कार्यक्रमातील एका सेगमेंटमध्ये प्रियाला सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला.
आणखी वाचा- “नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?
artificial intelligence use in film
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे सिनेअवतार

सुबोध भावेनं ‘हो किंवा नाही’ या सेगमेंटमध्ये प्रिया बापटला, “ट्रोल्समुळे कधी खूप मनस्ताप झाला आहे का?” असा प्रश्न विचारला. यावर प्रिया हो असं उत्तर दिलं. त्यानंतर ट्रोलिंगसंबंधी तिने तिला आलेला धक्कादायक अनुभवही सांगितला. प्रिया म्हणाली, “वेब सीरिजमधील एका सीनच्या क्लिपमुळे मला ट्रोल करण्यात आलं. पण अशावेळी लोक तुमच्या थेट घरात घुसतात असा अनुभव आला. त्या क्लिपनंतर मी माझ्या वैयक्तीक आयुष्यात कशी आहे इथंपासून ते अगदी माझा नवरा मला सुख देतो की नाहीपर्यंत जेव्हा भाष्य केलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं.”

आणखी वाचा- “तुम्ही सर्वात बेस्ट होतात…”, अभिनेत्री प्रिया बापटची आई-वडिलांसाठी भावूक पोस्ट

प्रिया बापट याबाबत बोलताना पुढे म्हणाली, “त्यावेळी मला असं वाटलं होतं. तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्यावर भाष्य करू नका. एक कलाकार म्हणून व्यावसायिक आणि वैयक्तीक आयुष्य आम्हाला वेगळं ठेवायलाच हवं. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि जेव्हा ही मर्यादा पार होते तेव्हा मला वाईट वाटतं. त्यावेळी त्यातून बाहेर पडायला मला ८-१० दिवस लागले. मी अक्षरशः रडले. पण त्यावेळी उमेशने मला समजावलं होतं.”