scorecardresearch

‘त्यांच्यामुळे’ बिवाली अवली कोहलीला मिळाला आवाज; प्रियदर्शनी इंदलकरने उलगडलं गुपित

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात प्रियदर्शनी प्रसाद खांडेकर, शिवाली परब आणि नम्रता संभेराव यांच्याबरोबर बिवाली अवली कोहली ही विनोदी भूमिका साकारते.

priyadarshani

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. या कार्यक्रमामुळे तिचा चाहतावर्ग खूप वाढला. या कार्यक्रमातील तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. अशातच गेले काही दिवस या स्किटमध्ये सकारत असलेलं बिवली अवली कोहली हे पात्र प्रचंड चर्चेत आहे. आता या पात्राच्या आवाजाबद्दल तिने एक गुपित उघड केलं आहे.

प्रियदर्शनी सध्या तिच्या ‘फुलराणी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. गेल्याच आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने अनेक मुलाखती दिल्या. त्या मुलाखतींच्या माध्यमातून तिने तिच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील काही किस्से ही शेअर केले. ‘मराठी किडा’ या यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ती साकारात असलेल्या बिवाली अवली कोहली या पात्राला कसा आवाज मिळाला हे सांगितलं.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, जोडप्याच्या साधेपणाने वेधलं लक्ष

प्रियदर्शनी प्रसाद खांडेकर, शिवाली परब आणि नम्रता संभेराव यांच्याबरोबर बिवाली अवली कोहली ही विनोदी भूमिका साकारत आहे. चौघांच्या या कॉमेडी स्किटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. तसंच या स्कीटमध्ये या चौघांच्या आवाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. याबाबत बोलताना प्रियदर्शनी म्हणाली, “बिवाली अवली कोहली हे पात्र खूप प्रसिद्ध झालं. हा आवाज आणि हे सुचलं कसं याचं सगळं श्रेय गोस्वामी सरांना जातं. मी लो टोनमध्ये बिवाली अवली कोहली म्हणाले. सुरुवातीला मी आवाज हलका लावला होता. नंतर सचिन गोस्वामी सरांनी मला आवाज काढून दाखवला. अशाप्रकारे बिवाली अवली कोहली हा आवाज मला सरांमुळे मिळाला.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘त्या’ अभिनेत्रीचं नशिब उजळलं, सुबोध भावेबरोबर करणार बहुचर्चित मराठी चित्रपट, टीझर पाहिलात का?

आता तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. तर बिवाली अवली कोहलीच्या आवाजामाची ही गोष्ट प्रियदर्शनीने सांगितल्यावर पुन्हा एकदा तिला याच भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुकता व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 11:15 IST

संबंधित बातम्या