Anita Date entry In Sanai Chaughade: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. २०१६ ला प्रदर्शित झालेल्या या मालिकेने जवळजवळ पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नवऱ्याभोवती विश्व असणाऱ्या राधिकाला जेव्हा धोका मिळतो, गुरू तिची फसवणूक करत असल्याचे समजते, तेव्हा ती काय करते. सगळ्या गोष्टींना कशी सामोरी जाते, स्वत:चे वेगळे विश्व कसे तयार करते. याबरोबरच एक सामान्य गृहिणी ते एक यशस्वी उद्योजिका हा तिचा प्रवास मालिकेत पाहायला मिळाला.

मालिकेत अनिता दातेने राधिका सुभेदार ही भूमिका साकारली होती. तर, अभिजीत खांडकेकर गुरूनाथ या भूमिकेत दिसला होता.शनाया या भूमिकेत रसिका सुनील दिसली होती. तर काही काळ ईशा केसकरने ही भूमिका साकारली होती. अभिनेता अद्वैत दादरकरने सौमित्र ही भूमिका साकारली होती. याबरोबरच, भारती पाटील, शर्मिला शिंदे, श्वेता मेहेंदळे असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते.

माझ्या नवऱ्याची बायको’ फेम राधिका सुभेदारची ‘सनई चौघडे’मध्ये जबरदस्त एन्ट्री

आता या मालिकेची आणि यामधील पात्रांची व कलाकारांची चर्चा होत आहे? तर राधिका सुभेदारची सनई चौघडे या मालिकेत एन्ट्री झाली आहे.

झी मराठी वाहिनीने, सनई चौघडे या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये एका महिलेची एन्ट्री होते. जयच्या केबीनमध्ये जात ती म्हणते, “मी राधिका सुभेदार…” पुढे ती जयला म्हणते, “तुम्हीच का ते जय खानोलकर? ज्यांच्या ऑफिसमध्ये स्त्रीयांना प्रवेशच नाही.” त्यावर जय तिला, हो. “मीच तो”, असे म्हणतो.

जयचे बोलणे ऐकून राधिका म्हणते, “जोपर्यंत तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्या स्त्रीला नोकरी देत नाही, तोपर्यंत मी तुमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार नाही.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “राधिका सुभेदारची अट जय खानोलकरला पडणार का भारी?”, अशी कॅप्शन दिली आहे.

जय खानोलकर उद्योजक आहे. त्याच्या कंपनीमध्ये फक्त पुरूष कर्मचारी काम करतात. याचे कारण म्हणजे जयला मुली आवडत नाहीत. मुलींवर त्याचा विश्वास नाही. त्यामुळे तो त्याच्या ऑफिसमध्ये मुलींना नोकरी देत नाही. आकाशच्या प्रोजेक्टसाठी शर्वरीची निवड झाली होती. काही दिवस तिने जयच्या ऑफिसमध्ये नोकरी केली. पण, जेव्हा त्यांच्यात मतभेद झाले. जय शर्वरीच्या आई-वडिलांना बोलला, त्यांचा स्वाभिमान दुखावला तेव्हा शर्वरीने नोकरी सोडली.

आता राधिकाची अट ऐकल्यानंतर जय काय करणार, शर्वरीला पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये काम करताना पाहायला मिळणार का, तसेच राधिकाच्या येण्याने काय बदल होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.