गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार २० सप्टेंबरला आई-बाबा झाले. दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी चिमुकलेचे आगमन झाल्यामुळे दोघं खूप खुश होते. “घरी लक्ष्मी आली,” असं लिहीतं दोघांनी ही आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली होती. काल राहुलच्या वाढदिवशी पत्नी दिशाला आणि गोंडस मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यासंबंधीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये राहुल आणि दिशाच्या लेकीचा चेहरा मात्र दिसला नव्हता. पण आता राहुल-दिशाच्या मुलीची पहिली झलक समोर आली आहे. हेही वाचा - परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स राहुल वैद्यची बहिणी श्रृती वैद्यने आपल्या भाचीबरोबरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुलची बहीण, आई-बाबा त्याच्या गोंडस मुलीबरोबर खेळताना पाहायला मिळत आहेत. पण यामध्ये राहुलच्या मुलीचा चेहरा लपवला आहे. रेड हार्ट आणि किसच्या इमोजी चिमुकलीच्या चेहऱ्यावर लावण्यात आले आहेत. हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम दरम्यान, पत्नी आणि मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राहुलने माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी तो म्हणाला की, "माझ्या वाढदिवसानिमित्ताने खूप मोठ गिफ्ट मला मिळालं आहे. संपूर्ण जगात इतकं सुंदर वाढदिवसाचं गिफ्ट मिळू शकत नाही. मी ईश्वराचा खूप ऋणी आणि आभारी आहे. आता पत्नी आणि चिमुकलीला डिस्चार्ज मिळाला असून आम्ही आता घरी जात आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आमच्या घरी लक्ष्मी आली आहे." हेही वाचा – ‘तुझी आवडती सेलिब्रिटी कोण?’; गौतमी पाटीलनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली… मुलीच्या नावाविषयी ‘हिंदुस्तान टाइम’शी बोलताना राहुल म्हणाला होता की, “अजूनपर्यंत नाव काय ठेवायचं, हे निश्चित झालं नाही. काही नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. पण राशीनुसार नाव ठेवणार असल्याचं हे मात्र निश्चित आहे.”