लोकप्रिय गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार अलीकडेच आई-बाबा झाले. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २० सप्टेंबरला दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतंच या गोंडस मुलीचं तिच्या आजी-आजोबांनी घरी स्वागत केलं. याचा व्हिडीओ राहुलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हेही वाचा - ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पाहा जबरदस्त प्रोमो २० ऑगस्टला दिशाने मुलीला जन्म दिल्यानंतर दोघांनी “घरी लक्ष्मी आली,” असं लिहीतं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. तेव्हापासून राहुल आणि दिशाच्या मुलीला पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. राहुलच्या बहिणीने भाचीबरोबरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता; जो चांगलाच व्हायरल झाला होता. हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’वर लवकरच येणार नवी मालिका; निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकरने केलं जाहीर आता राहुलने स्वतः लेकीच्या स्वागताचा व्हिडीओ शेअर केला आहे. पण यामध्ये मुलीचा चेहरा लपवण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत राहुलने लिहीलं आहे की, "आमच्या आयुष्यातला सर्वात खास दिवस २३ सप्टेंबर २०२३ हा आहे. पत्नी आणि लेक घरी आली, यापेक्षा जास्त मी माझ्या वाढदिवशी काहीच मागू शकत नाही. यावर्षी गणेश चतुर्थीला आमच्या घरी लक्ष्मी आली आहे. आजी, आजोबा आणि आत्याने ओवाळून तिचं घरी स्वागत केलं." हेही वाचा – मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण गौतमी पाटीलला आवडतं; म्हणाली… हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनची एक भुवई का असते वर? निर्मिती सावंत यांनी सांगितलं त्यामागचं रहस्य ‘हिंदुस्तान टाइम’शी राहुल वैद्यनं बाबा झाल्यानंतर पहिल्यांदा संवाद साधला होता. यावेळी तो म्हणाला होता की, “मला मुलगी झाल्याचं समजताच मी तीन-चार तास गप्प बसलो होतो. काय होतंय? हेच कळतं नव्हतं. मी सहा वेळ रडलो. अजूनही जेव्हा मुलीला पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू अनावर होतात. जेव्हा मी तिच्याशी बोलतो तेव्हा मला दाटून येतं. या आनंदाच्या क्षणी सर्वात पहिल्यांदा फोन मला सोनू निगम यांनी केला. ‘आमचा मुलगा बाबा झाला’ म्हणत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.”