मराठमोळा गायक ‘बिग बॉस १४’ फेम राहुल वैद्य सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरला आहे. तो त्याची पत्नी, अभिनेत्री दिशा परमारबरोबर ‘धमाल विथ पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये सहभागी झाला आहे. या शोमधील एक क्लिप सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. ती पाहून लोक ३९ वर्षीय राहुलला ट्रोल करत आहेत. व्हिडीओमध्ये, राहुलला लग्नापूर्वी त्याची पत्नी जी पाच कामं करायची, पण आता करत नाही, त्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना राहुलने पती-पत्नीमधील अत्यंत खासगी आणि बेडरूममधील गोष्टींचा उल्लेख केला. यावरून नेटकरी राहुलची टिप्पणी अतिशय अश्लील आणि दिशाचा अपमान करणारी असल्याचं म्हणत आहेत.

‘धमाल विथ पती पत्नी और पंगा’ या शोचे सूत्रसंचालन सोनाली बेंद्रे आणि मुनव्वर फारुकी करत आहेत. हा शो ‘पती पत्नी और पंगा’चा दुसरा सीझन आहे. यात सेलिब्रिटी जोडपे काही टास्क करतात आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देतात. शोच्या ताज्या एपिसोडमध्ये असाच एक सेगमेंट आला, ज्यामध्ये स्पर्धकांना अशा पाच गोष्टी विचारण्यात आल्या, ज्या त्यांच्या पत्नी लग्नापूर्वी करायच्या पण नंतर बंद केल्या.

राहुल वैद्यचा सेक्शुअल इंटिमसीकमी झाल्याकडे इशारा

राहुल वैद्यला हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने थेट न बोलता इशाऱ्याने शारीरिक संबंधांकडे (सेक्शुअल इंटिमसी) इशारा केला. लग्नानंतर त्यांच्यातील इंटिमसी कमी झाल्याचं त्याला म्हणायचं होतं. हे ऐकून त्याची पत्नी दिशा परमार थक्क झाली आणि म्हणाली, ‘तू वेडा आहेस का?’ शोचा सह-स्पर्धक अर्जुन बिजलानीने यावर टोमणा मारला. ‘मग तुम्हाला बाळ कसं झालं?’ ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षक राहुलच्या विधानावर टीका करत आहेत.

rahul-vaidya-disha-parmar-dhamaal-with-pati-patni-aur-panga-troll
राहुल वैद्य व दिशा परमार (इन्स्टाग्राम)

नेटकऱ्यांनी राहुल वैद्यला सुनावलं

एका ‘रेडिट’ युजरने या क्लिपवरून राहुल वैद्यवर टीका केली. ‘ही खूप वाईट गोष्ट आहे. हा त्याची पत्नी दिशा परमारचा हा मोठा अपमान आहे. कमीत कमी दिशाचा तरी विचार करायला हवा होता.’ दुसऱ्या एका युजरने त्यावर कमेंट केली, ‘हे पूर्णपणे आपल्या पत्नीचा अपमान करण्यासारखं आहे.’ आणखी एकाने लिहिलं, ‘अगदी घाणेरडा. तो बिग बॉसच्या काळापासूनच असा आहे. त्याला पत्नीचा आदर नाही.’

Rahul Vaidya and Disha Parmar in Dhamaal With Pati Patni Aur Panga
राहुल वैद्य व दिशा परमार (फोटो- इन्स्टाग्राम)

दुसरीकडे, राहुल व दिशाच्या चाहत्यांनी त्याची बाजू घेतली आहे. त्याने स्पष्टपणे शारीरिक संबंधांचा उल्लेख केला नाही, असं त्यांनी म्हटलं. तसेच हा व्हिडीओ प्रोमोतला असून तसा एडिट केलाय. व्हिडीओ पाहिल्याशिवाय त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही, असं काहींनी म्हटलं.

Rahul Vaidya and Disha Parmar in Dhamaal With Pati Patni Aur Panga
राहुल वैद्य व दिशा परमार त्यांची मुलगी नव्याबरोबर (फोटो- इन्स्टाग्राम)

राहुल वैद्य व दिशा परमारचं लग्न

‘इंडियन आइडल १’ चा सेकंड रनर-अप राहिलेल्या राहुल वैद्यने ‘बिग बॉस १४’ च्या घरातून दिशा परमारला प्रपोज केलं होतं. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये दोघांनी लग्न केलं. ३२ वर्षीय दिशा एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ती ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, ‘वो अपना सा’, ‘बडे अच्छे लगते हैं २’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं ३’ यांसारख्या मालिकांसाठी ओळखली जाते. त्यांना नव्या नावाची मुलगी आहे.