scorecardresearch

Premium

Rahul Vaidya And Disha Parmar: मुलीचं नाव काय ठेवणार? राहुल वैद्य म्हणाला, “राशीनुसार…”

बाबा झाल्यानंतर राहुल वैद्यला पहिला फोन आला ‘या’ लोकप्रिय गायकाचा

rahul vaidya
बाबा झाल्यानंतर राहुल वैद्यला पहिला फोन आला 'या' लोकप्रिय गायकाचा

बिग बॉसच्या १४व्या पर्वामुळे प्रसिद्धी झोतात आलेला गायक राहुल वैद्य काल बाबा झाला. पत्नी, अभिनेत्री दिशा परमार हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी राहुल आणि दिशा आई-बाबा झाले. “घरी लक्ष्मी आली,” असं लिहीतं दोघांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यामुळे सध्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच राहुलची बाबा झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

हेही वाचा – ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे झळकणार ‘या’ संगीतमय चित्रपटात; म्हणाला, “अखेर…”

surbhi
“आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “शाळेत असताना…”
actor vidyut jamwal
परिणीती चोप्रानंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या कोण आहे होणारी पत्नी
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
tu tewha tashi
Video: “आकाशात असतात सन, स्टार्स आणि मून…”, ‘तू तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याचा होणाऱ्या बायकोसाठी भन्नाट उखाणा

‘हिंदुस्तान टाइम’शी राहुल वैद्यनं बाबा झाल्यानंतर संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, “ही जी भावना आहे, ती व्यक्त करू शकत नाही. मी जगातील सर्वात नशीबवान माणूस आहे, असं वाटतं आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माझ्या घरी लक्ष्मी आली आहे. माझी मुलगी आणि दिशा दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे. सध्या माझं संपूर्ण कुटुंब खूप आनंदात आहे.”

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापचा कात्रजच्या नयनतारासह शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

मुलीला पहिल्यांदा पाहिल्याचा अनुभव सांगत राहुल म्हणाला की, “मला मुलगी झाल्याचं समजताच मी तीन-चार तास गप्प बसलो होतो. काय होतंय? हेच कळतं नव्हतं. मी सहा वेळ रडलो. अजूनही जेव्हा मुलीला पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू अनावर होतात. जेव्हा मी तिच्याशी बोलतो तेव्हा मला दाटून येतं. या आनंदाच्या क्षणी सर्वात पहिल्यांदा फोन मला सोनू निगम यांनी केला. ‘आमचा मुलगा बाबा झाला’ म्हणत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.”

हेही वाचा – ‘देवाला आवडणारा आवाज’; उत्कर्ष शिंदेने आजोबा प्रल्हाद शिंदेंचा दुर्मिळ व्हिडिओ शेअर करत आठवणींना दिला उजाळा, म्हणाला…

यावेळी राहुलला मुलीचा नावाविषयी प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला की, “अजूनपर्यंत नाव काय ठेवायचं, हे निश्चित झालं नाही. काही नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. पण राशीनुसार नाव ठेवणार असल्याचं हे मात्र निश्चित आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul vaidya talk about him new born baby girl name pps

First published on: 21-09-2023 at 19:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×