Rajat Dalal Marriage: गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली. त्यांचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. चाहत्यांनीदेखील त्यांच्या आवडत्या कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता बिग बॉस फेम एका स्पर्धकाने लग्नगाठ बांधली आहे.
‘बिग बॉस १८’ आणि ‘द ५०’ या शोमध्ये सहभागी झालेल्या रजत दलालने त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्नगाठ बांधली आहे. द ५० या शोमुळे रजत दलाल मोठ्या चर्चेत होतात.या शोमधील टास्क, भांडणे, एकमेकांवर केलेली टिका यांमुळे गेल्या काही दिवसांपासून रजत दलाल मोठ्या चर्चेत होतात. याच शोमध्ये चाहत पांडे व त्याच्या नात्याबद्दलही बोलले गेले. मात्र, शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात मैत्रीचे नाते असल्याचे चाहतने स्पष्ट केले होते. जेव्हा रजत द ५० मधून बाहेर पडला, त्यावेळीदेखील त्याला विविध मुलाखतींमध्ये तो कधी लग्न करणार आहे, असे विचारले गेले.
आता मात्र, रजतने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून त्याच्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहे. रजतने पांढऱ्या रंगाची शेरवाणी परिधान केली आहे. तर त्याच्या पत्नीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. दोघेही पारंपारिक कपड्यात सुंदर दिसत आहेत. तसेच, या फोटोंमधून त्यांचे लग्न एका नदीकिनारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या सानिध्यात रजतने लग्न केले. मोजक्या लोकांच्या उपस्थितित हा सोहळा संपन्न झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हे फोटो शेअर करत रजत दलालने आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात असे कॅप्शन लिहिले आहे. रजतने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि द ५० मधील रजतचा सहस्पर्धक फैजूने लिहिले, “खूप खूप शुभेच्छा”, बिग बॉस फेम कशिशने लिहिले, “तुझं लग्न झालं? अभिनंदन”, तसेच अरबाज पटेल, दिव्या अग्रवाल यांनीदेखील कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या. याबरोबरच, अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच, आशीर्वादही दिले आहेत.
आता रजत दलालच्या पत्नीचे नाव काय आहे, ती काय करते याबद्दल रजतने काहीही माहिती उघड केली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी फिल्म विंडोला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने रिलेशनशिपमध्ये असून त्याची गर्लफ्रेंड लवकरच त्याची पत्नी होऊ शकते, असे वक्तव्य केले होते.त्यानंतर आता थेट लग्नाचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान, रजत दलालच्या पत्नीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
